शाहरूखची मॅनेजर पूजा ददलानीचं घर स्वतः गौरी खानने सजवलं, होम डेकोर करताना काय काळजी घ्याल

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान सध्या ‘पठान’ सिनेमाचं यश साजरं करत आहे. या सगळ्यातच चर्चा आहे ती किंग खानची मॅनेजर पूजा ददलानी हिच्या घराची. पूजा ददलानीचं घर स्वतः शाहरूख खानची पत्नी गौरी खानने सजवलं आहे.

गौरी खान एक लोकप्रिय इंटिरिअर डिझाइनर आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांच्या घरांच डिझाइन गौरीने केलं आहे. गौरीने पूजाच्या घराचं केलेलं डिझाइन प्रत्येकालाच आवडत आहे. सोशल मीडियावर या सगळ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. तुम्ही देखील या घरातील इंटिरिअर टिप्स घेऊन आपलं घर सजवू शकता. (फोटो सौजन्य – Pooja Dadlani Gurnani इंस्टाग्राम) ​

लिव्हिंग रूमचा क्लासिक लूक

लिव्हिंग रूमचा क्लासिक लूक

पूजा ददलानीचे घर तिच्यासारखेच सुंदर आणि स्टायलिश आहे. दिवाणखान्यापासून घराच्या बाल्कनीपर्यंतचा प्रत्येक कोपरा अतिशय सुंदर डिझाइन करण्यात आला आहे. पूजा आणि गौरी या काऊचवर बसले आहेत. तुम्ही पाहू शकता अतिशय मोकळा लिव्हिंग एरिया आहे. यामुळे घर अतिशय मोठं दिसतं. तसेच लिव्हिंग रूममध्ये खूप गोष्टी ठेवलेल्या नाहीत. त्यामुळे डोळ्यांना खूप छान वाटत आहे. ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवू शकता.

हेही वाचा :  तरुणाई कुत्ता गोळीच्या विळख्यात, डॉबरमॅन, बुलडॉग नावाने बाजारात होते विक्री

(वाचा – हास्यजत्रा फेम ‘लॉली’ नम्रता संभेरावचं घर पाहिलंत का? स्वतःच्या हातांनी असं सजवलंय)​

poojadadlani4

poojadadlani4

poojadadlani4.

poojadadlani4-

पूजाने शेअर केले फोटो

पूजाने शेअर केले फोटो

काही काळापूर्वी, पूजा घराची रचना शाहरुख खानची पत्नी गौरी खानने केली होती, ज्याचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. स्वत: पूजा ददलानीने सोशल मीडियावर चाहत्यांना तिच्या घराची झलक दाखवली. गौरी खानने पूजाच्या घराला सुंदर आणि क्लासी लूक देण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही.

(वाचा – Curd आणि Yogurt मधील फरक तुम्हालाही कळत नाही? मग जरूर जाणून घ्या)​

या गोष्टींचा केलाय बारकाईने विचार

या गोष्टींचा केलाय बारकाईने विचार

मिंट कलरचा सोफा आणि लाकडी टेबल्स त्याला पूर्ण लुक देतात. तसेच, घरामध्ये लावलेल्या विंटेज लॅम्प शेड्स आणि झाडे निसर्गाच्या जवळची भावना निर्माण करतात. तसेच दिवाणखान्यातील मोठे झुंबर राजेशाही अनुभूती देते.

(वाचा – घरामध्ये पाल असेल तर होऊ शकतो गंभीर आजार, या घरगुती उपायांनी पळवून लावा पालीला))​

काचेच्या झुंबराचा वापर

काचेच्या झुंबराचा वापर

घर अधिक आलिशान दिसण्याकरता तुम्ही झुंबराचा वापर करू शकता. तसेच त्या झुंबरामागे मोठा आरसा लावला आहे. ज्यामुळे घराला वेगळीच शोभा आली आहे. दुसर्‍या एका फोटोमध्ये दोघ्या आरशाजवळ पोझ देत आहेत. तर दुसर्‍या एका फोटोमध्ये त्या एकमेकांशी बोलण्यात व्यस्त दिसत होते.

हेही वाचा :  Viral Video: जो बायडनच्या पत्नीने कमला हॅरिसच्या पतीला केलं KISS,VIDEO होतोय व्हायरल

(वाचा – चाळीत राहणाऱ्या भाऊ कदमचं डोंबिवलीतील आलिशान घर पाहिलं का?)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार…सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीडमधल्या मुंढेवाडी गावातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल …

Maharastra Politics : ‘रिपोर्टला वेळ का लागला? इमान विकलं पण…’, सुनील टिंगरे यांच्यावर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

Jitendra Awhad On Sunil Tingare : ससून रुग्णालयाचा डॅाक्टर अजय तावरे याने पुण्यातील पोर्श प्रकरणातील …