अशी बनवा आलं-लसूण पेस्ट ६ महिने होणार नाही खराब, बाजारातून आणण्याची पडणार नाही गरज

​कशी बनवाल आलं-लसूण पेस्ट​

​कशी बनवाल आलं-लसूण पेस्ट​
  • सर्वात पहिले आलं बारीक कापून घ्या
  • त्यानंतर लसणीच्या पाकळ्या सोला आणि आल्याबरोबर पाण्याशिवाय तुम्ही मिक्सरमधून वाटून घ्या
  • यामध्ये पाणी वा मॉईस्चर राहणार नाही याची काळजी घ्या
  • बारीक पेस्ट होईपर्यंत तुम्ही वाटत राहा मात्र पाणी अजिबात घालू नका
  • पेस्ट तयार झाल्यावर यात मीठ मिक्स करा आणि एक चमचा तेल घाला. मीठ आणि तेल घातल्याने पेस्ट अधिक काळ टिकते
  • यानंतर पुन्हा मिक्सर फिरवा आणि टेक्स्चर क्रिमी झाले आहे का बघा. तुमची पेस्ट तयार आहे

(वाचा – Cooking Hacks: हे ५ हॅक्स वापरून घरीच बनवू शकता सॉफ्ट इडली, बॅटर बिघडत असेल तर द्या वेळीच लक्ष)

​आलं – लसूण करण्याची दुसरी पद्धत​

​आलं - लसूण करण्याची दुसरी पद्धत​
  • आले बारीक किसून घ्या आणि त्यानंतर ते पसरवून उन्हात चांगले वाळवून घ्या. आलं सुकल्यावर ते मिक्सरमध्ये वाटा
  • लसूण न सोलता धुवा आणि त्याचे पाणी काढा
  • सालासकट जाडसर ही लसूण वाटून घ्या आणि मग उन्हात वाळवा
  • ही लसूण सुकल्यानंतर त्याची साले काढून टाका आणि मिक्सरमध्ये वाटा
  • तुमची आल्याची आणि लसणीची पावडर तयार आहे. तुम्हाला गरज असेल तेव्हा या दोन्ही पावडर एकत्र करून पाणी घालून त्याची पेस्ट करा
हेही वाचा :  Cooking Tips : ही एवढीशी गोष्ट पिठात मिसळल्यावर चपाती टम्म फुगते; हे सिक्रेट आपल्याला माहीतच नव्हतं...

(वाचा – Cooking Hacks: कुकरमध्ये असा शिजवा भात होणार नाही कोरडा, सुटसुटीत आणि मोकळ्या भाताची योग्य पद्धत )

​आलं – लसूण पेस्ट कशी कराल स्टोअर​

​आलं - लसूण पेस्ट कशी कराल स्टोअर​

बरेचदा प्रमाण चुकीचे घेतल्याने आलं – लसूण पेस्ट टिकत नाही. मात्र वर सांगितलेले प्रमाण घेतल्यास, तुमची आलं- लसूण पेस्ट अधिक काळ टिकते. मात्र हे स्टोअर कसे कराल हे पण जाणून घ्या.

  • आलं – लसूण स्टोअर करण्यासाठी कधीही प्लास्टिक वापरू नये तर काचेची बरणी वा जार वापरावा
  • लक्षात असू द्या, ही बरणी वा जार कोरडा असावा आणि एअरटाईटदेखील असावा
  • पेस्ट त्यात भरल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवा. ही पेस्ट साधारण ६ महिने आरामात टिकते
  • दोन्ही पदार्थांच्या पावडर केल्या असतील तर तुम्ही एअरटाईट डब्यात भरून ठेवा. हे ६ महिन्यापेक्षाही अधिक काळ टिकते

​अधिक सोप्या टिप्स​

​अधिक सोप्या टिप्स​

तुम्हाला पेस्ट अधिक चांगल्या पद्धतीने टिकवायची असेल तर तुम्ही पेस्ट तयार झाल्यानंतर बर्फाच्या ट्रे मध्ये चमच्याने ठेवा आणि मग त्याला रेफ्रिजरेट करू शकता. हे क्युब तयार होतील. तुम्हाला वापरायचे असेल तेव्हा थोडा वेळ आधी काढून ठेवा आणि त्याचा वापर करून घ्या.

हेही वाचा :  फडणवीसांच्या 'पवार सतत कोलांटी उड्या घेतात' टीकेवर पवार म्हणाले, 'त्यांना पराभवाची..'

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …