Breaking News

उर्फीच्या ट्वीटनं वेधलं लक्ष; म्हणाली, ‘माझ्यामुळे भारत…’

Urfi Javed: मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या स्टाईल आणि फॅशनमुळे चर्चेत असते. तिच्या सोशल मीडिया पोस्ट देखील अनेकांचे लक्ष वेधतात. नुकतेच उर्फीनं ट्वीट शेअर केलं आहे. ‘मग माझ्यामुळे तर भारत उद्ध्वस्त होईल’ असं या उर्फीनं या ट्वीटमध्ये लिहिलं. तिच्या या ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर (Social media) होत आहे. 

सैयदा फातिमा नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, ‘भूकंप का येतो? जेव्हा महिला गैर-पुरुषांसाठी सुगंधित वस्तूंचा वापर करतात, जेव्हा महिला गैर-पुरुषांसमोर नग्न व्हायला मागेपुढे पाहत नाहीत. जेव्हा शराब आणि मोशिकी या गोष्टी साधारण वाटतात. तेव्हा भूकंप येईल. देवा आम्हाला वाचव’ या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. 

सैयदा फातिमाच्या या पोस्टला मैथून नावाच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन रिप्लाय देण्यात आला आहे. ‘हे फॅक्ट चेक करावं लागेल.’ असा रिप्लाय  मैथून नावाच्या अकाऊंटनं सैयदाच्या पोस्टला दिला आहे. उर्फीनं मैथूनच्या पोस्टला रिप्लाय दिला आहे. ‘मग माझ्यामुळे तर भारत उद्ध्वस्त होईल..’ असा रिप्लाय उर्फीनं दिला आहे. उर्फीच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून उर्फीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली होती.  उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर उर्फीनं सोशल मीडियाच्या माध्यामातून चित्रा वाघ यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं.

हेही वाचा :  Year Ender 2022 : बॉलिवूडच्या 'या' सिनेमांनी जमवला 100 कोटींचा गल्ला

अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे. उर्फीला  बिग बॉस ओटीटी या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली.  तिला इंस्टाग्रामवर 4M मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टाला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Urfi Javed: ‘असं वाटतंय मला कोणीतरी मारलंय’; उर्फीच्या पोस्टनं वेधलं साऱ्यांचं लक्ष



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …