त्या तिसऱ्या व्यक्तीमुळे नात्यात पडली फुट आणि होत्याचं नव्हतं झालं, अनुभव ऐकून तुमचाही थरकाप उडेल

लग्न ही खूप सुंदर भावना आहे या गोष्टीमध्ये काहीच शंका नाही. एखाद्या नात्यात गुंतल्यावर जोडप्याचे आयुष्य सोपे राहत नाही.कारण पती-पत्नीला त्यांच्या नव्या आयुष्यात जुळवून घेण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. आपल्या जोडीदाराला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांना खूप वेळ एकत्र घालवावा लागतो. अशा प्रकारे हे नाते पूर्ण होते.पण कधी भांडणे झाली तर रागाच्या भारात आपण अनेक गोष्टी बोलून टाकतो. या गोष्टी कधी कधी आपण जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करतो. पण पुढे जाऊन या गोष्टीचे काय होईल हे सांगत येत नाही. असाच अनुभव आपल्यापैकी काही जणांना आला आहे. इतरांमुळे त्यांच्या नात्यावर कसा परिणाम झाला हे येथील अनेक जोडप्यांनी सांगितले आहे. (फोटो सौजन्य : Istock)

सासरची लोभी वृत्ती

सासरची लोभी वृत्ती

काही दिवसांपूर्वी मी नोकरी बदलली. याला कारणीभूत होते माझ्या सासरची लोभी वृत्ती. मी माझी नोकरी आणि घर कसे सांभाळू शकेन याची काळजी करण्याऐवजी त्यांना माझ्या पॅकेजमध्ये अधिक रस होता. त्याची लोभी वृत्ती पाहून मी मागे हटले. मी त्याच्यासोबत आर्थिक माहिती शेअर करणेच थांबवले. मात्र, माझे हे वागणे माझ्या पतीला पटत नाही. आणि आमच्याच भांडणे होऊ लागली.

हेही वाचा :  लग्न करायची इच्छा असूनही त्या एक गोष्टीमुळे लता मंगेशकरांनी लग्न केले नाही, कारण वाचून तुमचाही कंठ दाटून येईल

(वाचा :- माझी कहाणी : नवऱ्याचे माझ्यावर प्रेम नाही, त्याने मला पत्र लिहिले अन् ….) ​

नवीन शहरात स्थलांतर

नवीन शहरात स्थलांतर

लग्नानंतर मी नवीन शहरात शिफ्ट झाले आहे. पण मला हे शहर आवडत नाही. माझा नवरा खूप छान आहे. मी इथे नोकरीही सुरू केली आहे. पण मला नवीन नोकरी, वेगळी भाषा आणि या अनोळखी शहरातील लोक आवडत नाहीत. प्रत्येक सेकंदाला या शहरात राहण्याचे दडपण मला उदास करते. या सगळ्यामुळे मी माझ्या पतीसोबत वाद घालू लागते. या वादाचे रूपांतर कधी कधी प्रचंड भांडणात होते. मला कळत नाही आहे मी काय करु.

(वाचा :- Rose Day : व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवशी रोझ डे च का साजरा केला जातो? जाणून interesting Facts) ​

सासूला माझ्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा आहे

सासूला माझ्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा आहे

माझी सासू खूप छान आहे पण त्यांना खूप स्वच्छता लागते. टीव्हीच्या स्क्रीनवर धुळीचा एक तुकडाही नसावा अशी त्यांची अपेक्षा असते. घरातील प्रत्येक कपाट व्यवस्थित सेट केले पाहिजे. भांडी वापरताच ते स्वच्छ करावीत. पण मी नोकरी करते कामच्या गडबडीमध्ये या गोष्टी मला शक्य होत नाहीत. त्यामुळे आमच्यात अनेकदा वाद होतात. यामुळे माझे पतीही चिंतेत आहेत.

हेही वाचा :  Maharashtra Rain : घराबाहेर पडू नका, पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस; पुण्यासह 'या' जिल्ह्यांना रेट अलर्ट जारी!

वहिनी माझ्या नवऱ्याला भडकवते

वहिनी माझ्या नवऱ्याला भडकवते

माझ्या लग्नाचे पहिले वर्ष अनेक अडचणीतून गेले. माझं अरेंज मॅरेज आहे. माझी वहिनी माझ्या पतीला माझ्याविरुद्ध भडकवायची. माझ्या ड्रेसिंग सेन्सपासून माझ्या कुकिंग स्किल्सपर्यंत माझ्या प्रत्येक गोष्टी पतीला चुकीच्या गोष्टी सांगितल्या आहेत. सुरुवातीला माझे पती तिच्या बोलण्यात येऊ लागले.मला कळत नाही आहे मी काय करु.

पत्नीचा जिवलग मित्र

पत्नीचा जिवलग मित्र

माझी पत्नी तिची प्रत्येक समस्या तिच्या बेस्टफ्रेंडसोबत शेअर करते. ती माझ्याबरोबर ठीक आहे. माझ्या पत्नीच्या मित्राचे लग्न झालेले नाही. त्यामुळे त्याला लग्नानंतरचे आयुष्य कळत नाही. एवढेच नाही तर तो दर वीकेंडला आमच्या घरी येतो. प्रत्येक नात्याला मर्यादा असावी. मी माझ्या पत्नीशी याबद्दल बोलण्याचा विचार करत आहे.

नवऱ्याचे मित्र मंडळ ही माझी समस्या आहे

नवऱ्याचे मित्र मंडळ ही माझी समस्या आहे

माझ्या पतीचे मित्र मंडळ खूप मोठे आहे. ते सर्व जुगार खेळतात. ते घरी खोटे बोलतात आणि काही जण तर त्यांच्या पत्नीशी गैरवर्तन करतात. मला भीती वाटते की माझ्या नवऱ्यालाही तिच्या या सवयी लागू शकतात.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …