साहित्य संमेलनात नागराजनं सांगितला भन्नाट किस्सा

Akhil Bhartiy Marathi sahitya Sammelan: वर्ध्यात (Wardha) 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तसेच 17 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे. 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. यावेळी दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule), अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde), किशोर कदम (Kishor Kadam), लेखक अरविंद जगताप (Arvind Jagtap) यांची मुलाखत बालाजी सुतार यांनी घेतली. साहित्य संमेलनात नागराज मंजुळेनं लंडनमध्ये (London) त्याच्यासोबत घडलेला मजेशीर किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकल्यानंतर साहित्य संमेलनात उपस्थित असलेले प्रेक्षक खळखळून हसले. 

नागराजनं सांगितला लंडनमध्ये घडलेला किस्सा 

नागराजनं सांगितलं, ‘मी पहिल्यांदाच लंडनला गेलो होतो. भारतात कधी फाईव्ह स्टारमध्ये जाण्याचा योग आला नव्हता पण तिथे पहिल्यांदाच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेलो. माझे दोन मित्र माझ्यासोबत होते. ते प्रोड्यूसर आहेत. त्यांच्यासोबत मी तेथील स्टुडिओ अपार्टमेंटसारख्या एका रुममध्ये राहात होते. मी त्यांच्या मागेच जात होतो कारण मला फारसं काही माहित नव्हतं. रोज सकाळी उठल्यानंतर माझे मित्र चहा तयार करायचे. माझ्या एका मित्रानं लंडनमध्ये मिसळ तयार केली होती. ते खाऊन आम्ही फिल्म फेस्टिव्हल आणि इतर कामांसाठी बाहेर जात होते. एकदा माझे मित्र रुममध्ये आले नाहीत. तेव्हा मी एकटाच होतो. सकाळी उठल्यानंतर मी रुटिनप्रमाणे व्यायाम करत होते. तेव्हा मी चहा तयार करायला सुरुवात केली. त्या हॉटेलमध्ये इलेक्ट्रीक टी-मेकर होता.’

हेही वाचा :  "आतला जाळ मोकळा करत रहावं माणसांनी...", नागराज मंजुळेंचे 'ते' वक्तव्य चर्चेत | director Nagraj Manjule expressed comment on poetry and film verious topic nrp 97

पुढे नागराज म्हणाला, ‘मी त्या टी-मेकरमध्ये कधीच चहा तयार केला नव्हता. मी त्या टी-मेकरचा प्लग लावला, त्यामध्ये पाणी टाकलं आणि तो टी-मेकर मी तेथील शेगडीवर ठेवला. शेगडीपण चालु केली आणि टी-मेकरचा प्लग देखील चालू केला. त्यावेळी शेगडी पण गरम झाली आणि टी-मेकरमधील पाणी देखील उकळत होतं. मी व्यायम करत होते तेव्हा अचानक धूर यायला लागला. धूर आल्यानंतर रुममधील सायरन वाजत होता. सायर वाजल्यानंतर मी घाबरलो. हॉटेमधील स्टाफ मेंबर आले. मी काय केलं ते मला इंग्लिशमध्ये त्याला सांगाता येत नव्हतं. त्यानंतर तेथील स्टाफ मेंबरनं मला वेगळा टी-मेकर आणून दिला आणि त्यानं मला प्रोसेस सांगितली.’

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात किशोर कदम यांनी उपस्थित असलेल्यांना काही कविता ऐकवल्या. तसेच सयाजी शिंदे  यांनी देखील काही किस्से सांगितले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आश्चर्यच! अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पोहोचले विद्रोही साहित्य संमेलनात!

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …