Jhund : विजय बोरसे कोण? त्यांनी असं काय केलं की नागराज मंजुळेंना झुंड बनवावा वाटला…

Jhund Movie : आज बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असलेला “झुंड” (Jhund Hindi Cinema) चित्रपट प्रदर्शित होत आहे. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित हा चित्रपट नागपुरातील नावाजलेले फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे (Vijay Barse) यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आज सर्वत्र झुंडची चर्चा होत असताना विजय बारसे नेमके आहेत तरी कोण असा देखील सवाल अनेकांना पडला आहे. विजय बारसे यांनी 21 वर्षांपूर्वी नागपुरात “स्लम सॉकर” (Slum Soccer) अर्थात झोपडपट्टी फुटबॉलची सुरुवात केली होती. 

झोपडपट्टीतील वातावरणात वाईट सवयी, अमली पदार्थांच्या आहारी जाऊन अनेक मुले गुन्हेगारी विश्वात जात असल्याचे विजय बारसे यांच्या लक्षात आले. त्यानंतर विजय बारसे यांनी वर्ष 2000 मध्ये स्लम सॉकरची संकल्पना मांडली. फुटबॉल या क्रीडा प्रकाराच्या माध्यमातून झोपडपट्टीतील मुलांना शिस्तबद्ध फुटबॉलपटू तर बनवता येईल. शिवाय त्यांच्या जीवनाला योग्य वळण लावत गरीब कुटुंबातील मुलांना प्रगतीची नवी संधी ही उपलब्ध करून देता येईल असे विजय बारसे यांचे उद्दिष्ट होते.

त्यासाठी विजय बारसे यांनी नागपुरातील बोखारा भागात झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण तसेच जवळच्या शाळेत त्यांच्या शिक्षणाची सोय करत अशी निवासी अकॅडमी सुरू केली. क्रीडा आणि अभ्यास दोन्ही प्रकारात गरीब मुलांना संधी उपलब्ध करून दिली की ते प्रगतीची वाट स्वतः निर्माण करतील असा विजय बारसे यांचा विश्वास होता.

हेही वाचा :  तुझे फोटो मॉर्फ करून व्हायरल करेन', धमकी देत मैत्रिणीकडूनच उकळले तब्बल 'इतके' लाख रुपये

 हळू हळू स्लम सॉकरचा आकार वाढत गेला. आधी नागपूर, नंतर विदर्भ आणि हळू हळू महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यात तसेच देशाच्या 24 राज्यात स्लम सॉकर पसरले. गेले दोन दशके दरवर्षी देशभर होणाऱ्या स्लम सॉकर स्पर्धांमध्ये 4 लाख मुले खेळलेली आहे.

विजय बारसे यांच्या प्रेरणेने झोपडपट्टी फुटबॉलसह जोडले गेलेले अनेक मुलांनी क्रीडा विश्वात तर प्रगती केलीच शिवाय अनेकांनी शिक्षणात चांगली प्रगती करत आपले जीवन घडवले. वंचित घटकातील हजारो मुलांसाठी विजय बारसेंनी केलेली मेहनत आणि त्यांच्या गेल्या दोन दशकातील संघर्ष “झुंड” चित्रपट माध्यमातून नागराज मंजुळे यांनी सर्वांसमोर मांडलं आहे. 

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …