गोल्डन कुर्त्यामध्ये आदित्य ठाकरेंचा ग्लॅमरस अंदाज, तर रश्मी ठाकरेंच्या साडीने वेधले सर्वांचे लक्ष

Rahul Kanal wedding Guest: राजकारणी राहुल कनाल यांच्या लग्नामध्ये बॉलिवूड स्टार्सप्रमाणेच अनेक नेत्यांनीदेखील हजेरी लावली. या लग्नामध्ये आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरें यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या शाही लग्नामध्ये संपूर्ण ठाकरे कुटुंबीयांनी रॉयल एन्ट्री घेतली. या शुभकार्याला संपूर्ण ठाकरे परिवाराने हातमागावर तयार केलेल्या कपड्यांना प्राधान्य दिले. हातमागावर तयार केलेल्या कपड्यामध्ये विणकऱ्यांच्या भावना असतात त्यामुळेच कदाचित हे कपडे आकर्षक दिसतात. भारतीय हँडलूमला पाठिंबा देत रश्मी ठाकरे यांनी वाईन रंगाची साडी नेसली होती. या सिंपल लुकमध्ये त्या खूपच सुंदर दिसत होत्या. जास्त मेकअप न करता या कार्यक्रमामध्ये त्यांनी सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या. तर आदित्य ठाकरे यांनीदेखील कुर्ता परिधान केला होता. (फोटो सौजन्य : योगेन शाह)

असा होता आदित्य ठाकरेंचा लुक

असा होता आदित्य ठाकरेंचा लुक

या सुवर्णसंध्येला आदित्य ठाकरे यांना ऑलिव्ह ग्रीन रंगाचा कुर्ता परिधान केला होता. या कुर्तामध्ये ते खूपच हँडसम दिसत होते. यावेळी त्यांनी कुर्त्याच्या दोन्ही बाह्या फोल्ड केल्या होत्या. हातमागावर तयार केलेल्या या कुर्त्यामध्ये ते सर्वांमध्ये उठून दिसत होते. त्याचप्रमाणे यावेळी त्यांना कोल्हापुरी परिधान करुन मराठमोळ्या साजामध्ये त्याचा लुक पूर्ण केला.तुम्ही देखील लग्नाच्या सीझनमध्ये किंवा एखाद्या खास कार्यक्रमासाठी असा लुक कॅरी करु शकता.

हेही वाचा :  मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

(वाचा :- रवीना टंडनने रेखासोबत घेतला सेल्फी, केले एकमेकींना किस, रेखाच्या बनारसी साडीने चाहत्यांचा कलेजा केला खल्लास) ​

रश्मी ठाकरेंचा सिंपल पण एलिगंट लुक

रश्मी ठाकरेंचा सिंपल पण एलिगंट लुक

यावेळी रश्मी ठाकरे यांनी ग्लिटरी वाईन रंगाची साडी नेसली होती. या साडीवर गोल्डन रंगाची रेषांची डिझाईन काढण्यात आली होती. या सुंदर साडीचा गोल्डन रंगामध्ये मोठा काठ देण्यात आला होता त्यामुळे सर्वांचेच लक्ष त्याच्याकडे गेले. वाईन रंगाच्या या साडीवर सिल्वर आणि गोल्डन रंगाची सुंदर सांगड घालण्यात आली होती.

(वाचा :- पुन्हा दिसली अजय देवगण आणि तब्बूची घट्ट मैत्री, एकमेकांनी केले किस, स्टायलिश अवतारावर खिळल्या सर्वांच्या नजर)

पिंक रंगाने साडीला दिला नवा लुक

पिंक रंगाने साडीला दिला नवा लुक

या सुंदर वाईन रंगाच्या साडीला पिंक रंगाची बारीक बॉर्डरदेखील देण्यात आली होती. यावेळी रश्मी ठाकरे यांनी या साडीचा पदर सिंगल पिन करुन त्याचा लुक पूर्ण केला. या मराठमोळ्या लुकमध्ये Rashmi Thackeray खूपच सुंदर दिसत होत्या.

(वाचा :- Sai Tamhankar: ब्लॅक ड्रेसमध्ये सई ताम्हणकरच्या दिलखेच अदा, चाहते म्हणतात नाद करा पण सईचा कुठं )

अ‍ॅक्सेसरीजने दिला ग्लॅमरस लुक

अ‍ॅक्सेसरीजने दिला ग्लॅमरस लुक

या साडीला साजेशी अशी अ‍ॅक्सेसरीज देखील रश्मी ठाकरे यांनी कॅरी केली होती. यासाडीला साजेशी अशी गोल्डन पर्स त्यांनी कॅरी केली होती. तर एका हातामध्ये घड्याला तर दुसरी हातामध्ये लाल पांढऱ्या बांगड्या परिधान केला होत्या. तर गळ्यात सफेद कुंदन मोत्यांचा चोकर परिधान केला होता.(वाचा :- चिकनकारी सूटमध्ये जया बच्चनचा ग्लॅमरस, तर रेखाने केले चाहत्यांच्या हृदयावर वार, तुम्हीच सांगा सुंदर कोण ?)

हेही वाचा :  'असे हुजरे राज्याला काय न्याय देणार?', बांडगुळं म्हणत उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर सडकून टीका

कलाकारांची मांदियाळी

उद्धव ठाकरेंचा सिंपल लुक

उद्धव ठाकरेंचा सिंपल लुक

उद्धव ठाकरे यांनी ऑफ व्हाईट रंगाचा सिंपल कुर्ता परिधान केला होता. यावेळी त्यांनी ब्लॅक शूज परिधान करुन त्यांचा लुक पूर्ण केला.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …