४१ व्या वर्षीही विशीतला फिटनेस वयालाही देतेय मात अमृता राव, काय आहे डाएट

विवाह चित्रपटातील अमृता राव ही बऱ्याच मुलांना आवडली होती. आयुष्यात अशीच बायको असावी असं प्रत्येकाला वाटवं इतका सुंदर आणि सहज अभिनय अमृताने केला होता. इतकंच नाही तर अमृता आजही ४१ व्या वर्षी विशीतील तरूणीला लाजवेल इतकी सुंदर दिसते. मुळात ती इंडस्ट्रीत आल्यापासून जशी होती तशीच आताही आहे. या फिटनेसचं नक्की रहस्य काय आहे असा प्रश्न सर्वांनाच पडतो. एका मुलाची आई असेलेली अमृता नेहमीच सोशल मीडियावरही फोटो पोस्ट करत असते. अमृता नक्की काय डाएट करते घ्या जाणून. (फोटो सौजन्य – @amrita_rao_insta Instagram)

​एका मुलाची आई असूनही आहे फिट​

​एका मुलाची आई असूनही आहे फिट​

अमृता राव सध्या कोणत्याही चित्रपटात काम करत नसली तरीही पती आरजे अनमोल याच्यासह सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ बनवत असते. सोशल मीडियावर अमृताला अनेक फॉलोअर्स आहेत. अमृता आणि अनमोलला एक मुलगा आहे. मात्र अमृताच्या फिटनेसकडे पाहता अमृताचं वय ४१ आहे असं कोणीही म्हणणार नाही. अमृताने आपल्या फिटनेसचेही अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

हेही वाचा :  Big News : राज्याच्या धान्य कोठारात तब्बल 541 कोटी रुपयांचं धान्य खराब होण्याच्या मार्गावर; काय आहे यामागचं कारण?

​दिवसाची सुरूवात गरम पाण्याने​

​दिवसाची सुरूवात गरम पाण्याने​

अमृता रावच्या फिटनेसचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिल्यांदा गरम पाणी पिणे. उपाशीपोटी गरम पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ जायला मदत होते. त्यानंतर ज्युसचे सेवन अमृता करते. त्यामुळे अमृताच्या चेहऱ्यावर नेहमीच ताजेपणा दिसून येतो. कधीही थकवा दिसत नाही. तिच्या चमकदार त्वचेचे रहस्यही हेच असावे.

(वाचा – Shehnaaz Gill Birthday: शहनाझ गिलचा Fat To Fit प्रवास, वजन कमी करण्यासाठी केला या पदार्थांचा वापर)

​घरचा पौष्टिक आहार​

​घरचा पौष्टिक आहार​

नाश्त्यामध्ये पराठा अथवा ओट्सचे सेवन, दुपारी जेवताना दोन चपाती, भाजी, आमटी आणि भात असा साधासा आहार अमृता घेते. तर रात्री जेवतानाही अगदी हलके आणि पचायला सोपे असे घरगुती जेवणच अमृता खाते. यामध्ये तेलकट अथवा जंक फूडचा समावेश नसतो. त्यामुळे तिचे वजनही नियंत्रणात राहाते.

(वाचा – Weight Loss: आहारात समाविष्ट करा हिरवे चणे आणि घटवा पटापट वजन)

​कॉफी पिण्याची आवड​

​कॉफी पिण्याची आवड​

अमृताला कॉफी पिण्याची प्रचंड आवड आहे आणि दिवसातून कमीत कमी २-३ वेळा ती कॉफी पितेच. मात्र यासह ती साखर पोटात जास्त प्रमाणात जाणार नाही याचीही काळजी घेते.

हेही वाचा :  Turkey Earthquake : NDRFने ढिगाऱ्याखालून 6 वर्षांच्या मुलीला जीवंत वाचवलं, अमित शहांनी शेअर केला Video

(वाचा – नीता अंंबानी यांनी असे केले होते १८ किलो वजन कमी, या २ पदार्थांच्या सेवनाने मिळाला होता फायदा)

​फिट राहण्यासाठी योगाची मदत​

​फिट राहण्यासाठी योगाची मदत​

जिममध्ये अमृता जात नाही. तर दिवसाची सुरूवात योगाने ती करते. फिट राहण्यासाठी योगाचा नियमित सराव आणि वर्कआऊट करूनच स्वतःला या वयात अमृता फिट ठेवते. तिचे अनेक व्हिडिओही व्हायरल होतात. पती अनमोलसह अनेकदा ती वर्कआऊट अथवा योगा करताना दिसून येते.

जास्त दगदग नाही आणि सकारात्मक राहणे तसंच योग्य आहार आणि नियमित योगा यामुळेच आजही अमृता आहे तशीच फिट आहे. तुम्हीही तुमच्या रोजच्या आयुष्यात असा नियम स्वतःला घालून घेतला तर अमृताचा फिटनेस तुमच्यासाठीही योग्य ठरू शकतो.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘सर्वात मोठा घोटाळा, नियम ‘कात्रज’च्या धाब्यावर…’, रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Rohit Pawar On Ambulance Scam : राज्याच्या आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाल्याचा …

औरंगजेबाने तोडलेली मंदिर पुन्हा बांधण्यापासून महिलांची सेना बनवण्यापर्यंत..’, महाराणी अहिल्याबाईंची प्रेरणादायी कहाणी

Ahilyabai Holkar jayanti 2024: 31 मे रोजी  महाराणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी केली जाते. …