१०८ किलो वजन कमी केल्यानंतर पुन्हा वाढलं Anant Ambani चं वजन, आई नीता अंबानीने सांगितलं या आजाराचं कारण

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा नुकतीच राधिका मर्चंटसोबत साखरपुडा झाला. मुंबईतील ‘अँटिलिया’ या घरात हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींचाही सहभाग होता. मात्र सर्वत्र फक्त अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या सुंदर जोडप्याचीच चर्चा होत आहे. यासोबतच अनंत अंबानींच्या वजनाबाबत इंटरनेटवर अनेक प्रकारच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

२०१६ मध्ये १०८ किलो वजन कमी केल्यानंतर अनंत अनेक लोकांसाठी वजन कमी करण्यासाठी प्रेरणादायी ठरला. मात्र आता त्याचे वजन पुन्हा वाढले आहे. यामागचे कारण जाणून घेण्यासाठी लोक गुगलवर सर्च करत आहेत. येथे तुम्हाला अनंत अंबानींच्या वजन कमी करण्याच्या प्रवासापासून ते वजन वाढण्याच्या कारणापर्यंत तपशीलवार माहिती मिळेल. (फोटो सौजन्य – Yogesh Shah / iStock)

नीता अंबानी यांनी सांगितलं का वाढलं वजन

नीता अंबानी यांनी सांगितलं का वाढलं वजन

TOI ला 2017 च्या मुलाखतीदरम्यान, नीता अंबानी यांनी मुलगा अनंतच्या लठ्ठपणाबद्दलही उघडपणे बोलले. त्यांनी सांगितले की, अनंतला दम्यामुळे स्टेरॉईड्स घ्यावे लागतात. त्यामुळे त्याला लठ्ठपणाचा त्रास होत आहे. रिपोर्ट्सनुसार, यापूर्वी अनंतचे वजन 208 किलो असायचे.

हेही वाचा :  Video: मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये फसलेल्या रिक्षा चालकाने दाखवले भन्नाट टॅलेंट, परफॉर्मन्स एकदा पाहाच!

​(वाचा – दारूमुळे Liver सडू लागल्याची ही सुरूवातीची ६ लक्षणे, किती प्रमाणानंतर दारू बनते विष)​

अस्थमाकरता स्टेरॉइड कसे मदत करते

अस्थमाकरता स्टेरॉइड कसे मदत करते

दम्याची लक्षणे (दमा अटॅक) बिघडल्यास, डॉक्टर स्टिरॉइड औषध लिहून देऊ शकतात. हे औषध दम्यामुळे श्वसनमार्गामध्ये होणारी जळजळ कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे श्वासोच्छवासाची समस्या नगण्य आहे.

(वाचा – Piles Causing Foods : पचनक्रियेला अक्षरशः गंज लावतात हे १० पदार्थ, यामुळेच होतो मुळव्याधाचा त्रास)​

स्टेरॉइडमुळे कसे वाढते वजन

स्टेरॉइडमुळे कसे वाढते वजन

दमा आणि फुफ्फुस संघटना UK च्या मते, जर तुम्हाला दमा असेल, तर तुमची लक्षणे वाढू लागल्याने व्यायाम करणे किंवा सक्रिय राहणे अधिक कठीण होऊ शकते. यासोबतच जास्त वेळ स्टेरॉईड्स घेतल्यानेही सामान्यपेक्षा जास्त भूक लागते. ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका अनेक पटींनी वाढू शकतो. स्टेरॉईड औषधांमुळे पाणी साचल्याने सूज येण्याचाही धोका असतो, त्यामुळे वजन वाढू शकते.
​(वाचा – Suniel Shetty च्या दिवसाची सुरूवात होते या पदार्थाने, ६१ व्या वर्षी जावई KL Rahul ला लाजवेल असा Fitness)​

या एक्सरसाइज रूटीनने केलं वजन कमी

या एक्सरसाइज रूटीनने केलं वजन कमी

2016 मध्ये, अनंत अंबानींच्या वेटलॉसने इंटरनेटवर तुफान लोकप्रियता मिळवली. अनंतने केवळ १८ महिन्यांत नैसर्गिकरित्या १०८ किलो वजन कमी केले होते. त्यासाठी तो रोज ५ ते ६ तास व्यायाम करत असे. त्यात २१ किमी चालणे, योगासने, वजन प्रशिक्षण, कार्यात्मक प्रशिक्षण, कार्डिओ यांचा समावेश होता.

हेही वाचा :  अनंत अंबानीचा राधिका मर्चंटसोबत झाला रोका, १८ महिन्यांत १०८ किलो वजन केलं कमी

(वाचा – Suniel Shetty च्या दिवसाची सुरूवात होते या पदार्थाने, ६१ व्या वर्षी जावई KL Rahul ला लाजवेल असा Fitness)

वजन कमी करण्यासाठी हा डाएट केला फॉलो

वजन कमी करण्यासाठी हा डाएट केला फॉलो

अनंतने वजन कमी करण्यासाठी शून्य-साखर, उच्च-प्रथिने आणि कमी चरबीयुक्त, कमी-कार्ब आहाराचे पालन केले. तो दररोज १२००-१४०० कॅलरी वापरत होता.
तसेच त्याच्या ताज्या हिरव्या भाज्या, कडधान्ये, स्प्राउट्स आणि दुग्धजन्य पदार्थ जसे की चीज आणि दूध यांचा समावेश होता. यासोबतच त्यांनी या काळाकरता जंक फूडही पूर्णपणे टाळले होते.
(इंग्रजीत हे आर्टिकल वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …