Richest People In World: अंबानी श्रीमंत व्यक्तींच्या यादीत Top 10 मधून बाहेर; संपत्तीमध्ये मोठी घसरण

Richest People In The World: भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ने अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आता जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. गेल्या आठवड्यात नेटवर्थमध्ये घट झाल्याने मुकेश अंबानी टॉप-10 मधून बाहेर (Mukesh Ambani Out From Bloomberg Top 10 Billionaires List) पडले. ‘ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्स’च्या (Bloomberg Billionaires Index) यादीत मुकेश अंबानी 11 व्या क्रमांकावर घसरले आहेत. आता टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत फक्त एकच भारतीय अब्जाधीश आहे.

पहिल्या स्थानावर मस्क

जगातील श्रीमंतांच्या यादीत पुन्हा एकदा मोठा फेरबदल झाला आहे. जगातील आघाडीच्या अब्जाधीशांच्या यादीतून मुकेश अंबानी पहिल्या 10 मधून बाहेर पडले आहेत. पण भारत आणि आशियातील अतिश्रीमंत व्यक्तींमध्ये असलेल्या अदानी समुहाच्या गौतम अदानी या यादीमध्ये कायम आहेत. ते या यादीमध्ये टॉप 10 मध्ये असलेले एकमेव भारतीय आहेत. अदानी आणि ‘ॲमेझॉन’चे माजी सीईओ जेफ बेझोस हे दोघे एकावेळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क यांना यादीत दुसऱ्या क्रमांकासाठी काट्याची टक्कर देत आहेत. ‘ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्स’च्या यादीत मुकेश अंबानी 11 व्या क्रमांकावर घसरले आहेत.

हेही वाचा :  तेच कपडे पुन्हा वापरले? Radhika Merchant च्या साधेपणानं जिंकली मनं; पाहून म्हणाल अंबानींची होणारी सून लाखात एक

मुकेश अंबानींची नेटवर्थ घसरली

मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज भारतातील सर्वाधिक मूल्य असल्या कंपन्यांपैकी एक असून गेल्या 20 वर्षांपासून मुकेश अंबानी यशस्वीरीत्या कंपनीचे नेतृत्व करत आहे. गेल्या बऱ्याच काळापासून अंबानींनी ‘ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्स’च्या पहिल्या 10 अब्जाधीशांच्या यादीत उपस्थिती कायम ठेवली होती. मात्र, गेल्या आठवड्यात नेटवर्थमध्ये घट झाल्याने मुकेश अंबानी टॉप-10 मधून बाहेर पडले. मुकेश अंबानी सध्याच्या आकडेवारीनुसार 85.2 अब्ज डॉलर्सचे मालक आहेत. मुकेश अंबानींच्या संपत्तीत मागील आकडेवारीपेक्षा 778 लाख डॉलरने घट झाली असून या वर्षातील स्थिती पाहिल्यास रिलायन्स समूहाच्या अध्यक्षांच्या एकूण संपत्तीत 1.93 बिलियन डॉलरने कमी झाली आहे.

पहिल्या 10 मध्ये एकच भारतीय

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे जगातील अब्जाधीशांच्या यादीत एकमात्र भारतीय आहेत. अदानीच्या खिशात सध्या 121 अब्ज डॉलरची संपत्ती असून यावर्षी त्यांनी 188 लाख डॉलरची कमाई केली.

मुकेश अंबानींच्या पुढे कोण?

अमेरिकन उद्योगपती स्टीव्ह बाल्मर 86.1 बिलियन डॉलरच्या एकूण संपत्तीसह मुकेश अंबानींच्या वरचढ ठरले आणि पहिल्या 10 अब्जाधीशांच्या यादीत 10 वा क्रमांक काबीज केला. याशिवाय ॲमेझॉनचे जेफ बेझोस 120 अब्ज डॉलरच्या एकूण संपत्तीसह अदानींच्या तिसऱ्या क्रमांकाच्या अगदी जवळ, चौथ्या क्रमांकावर, आहेत.

हेही वाचा :  ना मुकेश, ना नीता..अंबानी परिवारातील 'हा' सदस्य रिलायन्सचा सर्वात मोठा मालक!

अब्जाधीशांची यादी

दरम्यान, जगातील अतिश्रीमंतांच्या यादीत बर्नार्ड अर्नाल्ट यांनी 186 अब्ज डॉलरच्या एकूण नेटवर्थसह आपले पहिला क्रमांक कायम ठेवला असून एलन मस्क 139 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहेत. अर्नाल्ट आणि मस्कच्या संपत्तीत 47 अब्ज डॉलरचा फरक आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …