Republic Day speech in Marathi : प्रजासत्ताक दिनानिमित्त द्या हे सोपं आणि छोटं भाषण, सहज होईल पाठ

Republic Day Speech In Marathi 2023 : 26 जानेवारी 2023 भारत आपला 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. हा दिवस भारतासाठी खूप खास आहे आणि म्हणूनच दरवर्षी 26 जानेवारी हा राष्ट्रीय सुट्टीचा दिवस मानला जातो. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची भाषणे, देशभक्तीवर गीते,  सामूहिक कवायती, आर एस पी, एन सी सी परेड, स्काऊट गाईड पथक परेज अशी कितीतरी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जर तुम्हीही प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण करण्याची तयारी करत असाल तर त्यासाठी सोपं आणि छोटं भाषण, सहज पाठ होईल अशा काही टिप्स या ठिकाणी दिल्या आहेत. त्या टिप्स वापरुन तुम्ही भाषणाची तयारी केल्यास तुम्ही आकर्षण केंद्र ठरू शकता…

म्हणून 26 जानेवारी दिवस साजरा केला जातो

26 जानेवारी 1950 रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले. कारण देश स्वतंत्र झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी 26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. 26 जानेवारीला संविधान लागू करण्याचे मुख्य कारण म्हणजे 1930 मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती. 

हेही वाचा :  उपाययोजना आखा! गणेशोत्सवाच्या धामधुमीत निपाहमुळे महाराष्ट्र सतर्क; राज्याच्या साथरोग विभागाचे निर्देश

वाचा: क्रिकेटचा ‘या’ खेळात होऊ शकतो समावेश, जाणून घ्या याविषयी सविस्तर 

भाषणाची अशी करा तयारी

  • या दिवशी भाषण करण्यापूर्वी एक दिवस आधी तुम्ही भाषण करताना तुमचा सूर एकसारखा असेल आणि तुम्ही कोणताही मुद्दा विसरणार नाही यासाठी घरातल्या वडिलधाऱ्यांसमोर भाषणाचा सराव करु शकता. 
  • तसेच प्रजासत्ताक दिवसी संपूर्ण भाषण लिहून एक आराखडा तयार करा. असं केल्याने तुम्ही महत्त्वाची माहिती विसरणार नाही. तसेच तुमचा प्रेक्षकांवरही चांगला प्रभाव पडेल. 
  • भाषणाच्या सुरूवातीला तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना अभिवादन करण्याचे नेहमी लक्षात ठेवा. 
  • अभिवादन केल्यानंतर आपला परिचय द्या आणि त्यानंतर भाषण सुरू करा. 
  • भाषण सोप्या आणि बोलीभाषेत असलं पाहिजे. 
  • भाषणाच्या शेवटी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभारही मानले पाहिजेत. 

26 जानेवारीसाठी खास मराठीत भाषण… 

नमस्कार! आज भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत. या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझे गुरुजन वर्ग, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो! आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी….आपणाला दोन शब्द सांगणार आहे. ते आपण शांतचित्ताने ऐकावेत. हीच नम्र विनंती…

राष्ट्रीय सण उत्सव म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर दोन दिवस पटकन उभे राहतात. ते म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. ज्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन हा आपला एक राष्ट्रीय उत्सव आहे. त्याच पद्धतीने आपण 26 जानेवारी हा दिवस देखील एक राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतभर आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. …. परंतु या स्वतंत्र झालेल्या भारताला एक राष्ट्र म्हणून किंवा लोकांच्या कल्याणासाठी यापुढे देशाची राज्यव्यवस्था कशी असावी? आपला स्वतंत्र भारत देश कोणते नियमाने कायद्यांच्या चौकटीमध्ये राहून या स्वातंत्र्याचा अगदी आनंदाने उपभोग घेणार आहे? या सर्वांसाठी काही एक नियम बनवणे आवश्यक होते. या कामासाठीच घटना समिती स्थापन करण्यात आली.

हेही वाचा :  'RPF जवान चेतन सिंहच्या मेंदूत रक्ताची...', कुटुंबाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले 'तो नेहमीच...'

भारतीय राज्यघटना निर्माण करण्यासाठी जी घटना समिती नेमली होती. त्या घटना समितीमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. या समितीत एकूण  318 सदस्य होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल 2 वर्षे 11 महिने 18 दिवस या कालावधीत इतर राष्ट्रांच्या अनेक राज्य घटनांचा अभ्यास करून, याच बरोबर भारतीय समाज रचना या सर्वांचा सांगोपांग विचार करून देशासाठी एक मजबूत संविधान बनवले…. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मी तर उद्धव ठाकरेंचं सिंहासनही…,’ प्रचारसभेत कंगनाचं जाहीर विधान, म्हणाली ‘तुमची औकात काय?’

LokSabha Election: हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) मंडी लोकसभा मतदारसंघासाठी 1 जूनला मतदान होणार आहे. मतदानाची …

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंद

Pune Water Cut on Friday : उन्हाचा तडाखा वाढत असताना आता पुणेकरांच्या नळाचं पाणी गूल …