स्वामी विवेकानंदांच्या या 4 गोष्टी ज्यामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल

आयुष्य जगताना आपल्याला काही व्यक्तीचे विचार आत्मसात करावे लागतात.आपल्या देशात असे अनेक महापुरुष झाले आहेत, ज्यांच्या जीवनातून आणि विचारातून खूप काही शिकता येते. अशात विवेकानंदांच्या आदर्श जीवनापासून प्रेरणा घेता येईल. स्वामी विवेकानंदांचे असे काही संदेश आहेत, जे तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतात. म्हणूनच त्यांच्या जीवनातून आपण सर्वांनी काही गोष्टी शिकल्या पाहिजेत.
या लोकांचे विचार असे असतात की, हरवलेल्या माणसाने ते वाचले तर त्याला जीवन जगण्याचे उद्दिष्ट मिळू शकते. विवेकानंदांच्या तत्त्वांचे पालन करून जीवन कसे जगावे हे शिकता येते. विवेकानंदाचे विचार तुम्हाला आयुष्यात खूप गोष्टी मिळवून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी. (फोटो सौजन्य – istock/indiatimes)

स्वतःवर विश्वास ठेवा

स्वामी विवेकानंदच्या मते, ‘विश्वातील सर्व शक्ती आपल्याच आहेत. आयुष्यातील कठीण काळात तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला तर या जगात तुमच्यासाठी अश्यक असे काही नाही. त्यामुळे नेहमी स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. आयुष्यात बरेचदा असे वाटते की सर्वकाही संपले आहे, परंतु तुम्हाला स्वतःवरचा विश्वास गमावण्याची गरज नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वत:वर विश्वास ठेवा. (फोटो सौजन्य – istock) (वाचा :- अशी सुरु झाली केएल राहुल आणि अथिया शेट्टीची फिल्मी लव्हस्टोरी,सुनील शेट्टीनेही बजावली महत्त्वाची भूमिका )

हेही वाचा :  Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

​कठोर परिश्रमानंतर यश नक्की मिळते

जर तुम्ही तुमच्या कामात मेहनत घेतली तर तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. विवेकानंदांचाही असाच विश्वास होता, ते म्हणाले, ‘एकावेळी एक गोष्ट करा आणि मनापासून करा, बाकी सर्व विसरून जा.

जेव्हा तुम्ही आवडीने कोणतेही काम करता तेव्हा त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते, मग ते तुमचा अभ्यास असो, नोकरी असो किंवा व्यवसाय असो. ही गोष्ट श्रीकृष्णाने देखील सांगितली आहे तुम्ही कर्म करा फळाची चिंता करु नका. (फोटो सौजन्य – istock) (वाचा :- राहुल द्रविडला चिअरअप करण्यासाठी दक्षिण अफ्रिकेत पोहचली विजेता,स्वप्नाहून सुंदर प्रेम कहाणी )

​सत्यावर विश्वास ठेवा

सर्वात शक्तिशाली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वत:शी खरे असणे. असे म्हणतात की सत्याला पुराव्याची गरज नसते आणि ते तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यास मदत करते. विवेकानंद म्हणायचे की स्वतःवर विश्वास ठेवणे हाच सर्वात मोठा धर्म आहे.

खरं तर, जेव्हा तुम्ही लोकांशी चांगले वागता, सर्वांचा आदर करता आणि विशेषत: स्वतःशी प्रामाणिक राहता, तेव्हा तुम्ही आपोआप यशाच्या शिडीकडे वाटचाल सुरू करता. आयुष्यात सर्वात अधिक स्वत:वर प्रेम करणं शिका. (फोटो सौजन्य – iStock) (वाचा :- पहिले नाते तुटल्यानंतर साऊथ अभिनेत्रीने केले दुसरे लग्न, ४ महिन्यांनंतर पतीसाठी शेअर केली खास पोस्ट म्हणाली)

हेही वाचा :  Baba vanga : महायुद्ध, त्सुनामी आणि कृत्रिम मानव... 2023 साठी बाबा वेंगाची 7 भयानक भाकितं

​आयुष्यात कधीही निराश होऊ नका

स्वामी विवेकानंदांचा असा विश्वास होता की जीवनात यश अपयश या गोष्टी येतातच. ही काही मोठी गोष्ट नाही, परंतु त्यानंतरही हार मानणे ही सर्वात मोठी कमतरता आहे. तुमची चिकाटी तुमचे समर्पण दर्शवते. जर तुम्ही काही काम करत असाल तर तुम्हाला यश मिळेलच असे नाही, पण अपयशाची भीती बाळगण्याची गरज नाही.

वारंवार अपयश आल्यावरही निराश होऊ नका, तर प्रयत्न करत राहा आणि पुढे जात राहा. जी व्यक्ती पडल्यानंतर पुन्हा उठण्याचा प्रयत्न करते तो एक ना एक दिवस नक्कीच यशस्वी होतो, कारण त्याची विचारसरणी सकारात्मकतेने भरलेली असते. (वाचा :- रितेश देशमुखने सांगितले पती बायकोवर हात का उचलतो? यावर देशमुखांच्या लाडक्या सुनेने दिलेले उत्तर ऐकून भारावून जाल)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

MPSC परिक्षेत अंध मालाचे प्रकाशमय यश! 20 वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या अनाथ मुलीने इतिहास घडला

अनिरुद्ध दवाळे, अमरावती, झी मीडिया : दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या अमरावतीतल्या माला पापळकर या तरुणीने …

महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार? हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी; अंदमानात दाखल

Monsoon in Maharashtra: महाराष्ट्रातील सर्व नागरिक सध्या उकाड्याने प्रचंड त्रस्त आहेत. खासकरुन मुंबई, पुणे सारख्या …