Room Heater खरेदी करताना या ५ गोष्टींकडे द्या लक्ष, वीज बिल येईल कमी

नवी दिल्ली: Heater Tips: सध्या देशभरात थंडीने जोर धरला आहे . काही ठिकाणी तर १.१ अंश तापमानाची नोंद झाली आहे. अशात अनेक जण थंडीपासून रक्षण करण्यासाठी हीटरचा वापर करतात. पण, हीटर खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे. हीटर घेण्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुम्हाला प्रोडक्ट तर चांगले मिळेलच. पण, तुमचे वीज बिलही कमी होईल.

वाचा: या Jio, Airtel, BSNL, VI प्लान्समध्ये ३६५ दिवसांपर्यंतच्या व्हॅलिडिटीसह मिळतात सुपरहिट बेनिफिट्स

लहान खोलीसाठी हीटर कसे असावे?

जर तुमची खोली लहान असेल तर, तुम्ही नेहमी इन्फ्रारेड हीटर खरेदी करा. त्यांचा खर्चही खूप कमी आहे. हे हीटर्स मोठ्या खोल्यांमध्ये काम करत नाहीत. म्हणूनच ते लहान खोल्यांसाठी एक योग्य पर्याय मानले जातात. हे ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी केले जाऊ शकतात.

वाचा: Samsung Galaxy F04 चा पहिला सेल आज, फोन अवघ्या ५९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार

व्होल्टेजकडे विशेष लक्ष द्या:

आपल्याला व्होल्टेजवर विशेष लक्ष द्यावे लागेल. जर तुम्ही १००० W चा हीटर विकत घेत असाल आणि तुम्ही तो एकूण एक तास वापरला तर, फक्त १ युनिट खर्च होईल. आता तुम्ही दिवसभरात किती वेळ हीटर वापरता हे तुमच्यावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ: जर तुम्ही दिवसाचे ४ तास हीटर चालवत असाल आणि तुमच्या युनिटची किंमत ७ रुपये असेल तर, एका दिवसासाठी वीज वापर २८ रुपये आहे. अशा प्रकारे, तुमचा मासिक खर्च फक्त हीटरसाठी ८४० होतो. जो फार नाही.

हेही वाचा :  UPI Payment खूप वापरत असाल तर द्या लक्ष, एक चूक पडू शकते महागात

मोठ्या खोलीसाठी हीटर कसे असावे ?

जर तुमची खोली मध्यम आकाराची असेल तर, तुम्ही फक्त फॅन हीटर घ्या. कारण त्यामुळे खोलीत उष्णता पसरते. जर तुमची खोली मोठी असेल तर, तुम्ही ऑइल फिल्ड हीटर घेऊ शकता. मध्यम आकाराच्या आणि मोठ्या आकाराच्या खोल्यांसाठी हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो.

वीज बिलात कपात होणार:

वॅट्स व्यतिरिक्त वीज बिल आणखी एका मार्गाने कमी करता येते. अनेक हीटर्स बिल्ट इन टाइमरसह सुसज्ज असतात. हीटर सुरू करण्यासाठी आणि थांबविण्यासाठी टाइमर सेट करण्याचा पर्याय आहे. तसेच, हीटरच्या स्टार रेटिंगकडे लक्ष दिले पाहिजे. रेटिंग जास्त असेल, वीज बिल कमी असेल.

पोर्टेबल हीटर: पोर्टेबल हीटर खरेदी करणे कधीही चांगले. तुम्ही हीटर एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवू शकता. तुम्ही ते एका खोलीतून दुसऱ्या खोलीत सहज हलवू शकता.

वाचा: नवीन हेडफोन्स खरेदी करायचेय ? boAt Rockerz 550 मिळताहेत १८०० रुपयांत

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडून मोठी चूक झाली, माझ्या बापाचा…’, Video शेअर करून जितेंद्र आव्हाड यांनी मागितली जाहीर माफी

Controversy of Manusmriti movement in Mahad : जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या महाड आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब …

पृथ्वीचा शेवटचा देश कोणता? जिथे अवघे 40 मिनिटेंच होतो सूर्यास्त

पृथ्वी गोल आहे, अशा गोलाकार पृथ्वीचा शेवटचा देश कोणता? त्या देशाचं वेगळेपणं काय हे जाणून …