फक्त 30 दिवसांत इम्युनिटी, मानसिक शांती मिळेल व शरीरातील सर्व आजार होतील दूर

योग (Yoga) ही भारताला मिळालेली ५००० वर्षे जुनी देणगी आहे. पण गंमत म्हणजे भारतीय लोक दिवसेंदिवस त्यापासून दूर जात आहेत. धकाधकीचं जीवन आणि आरोग्याकडे दुर्लक्ष शरीरासाठी भारी पडू लागलं आहे. त्यामुळे आपण आपल्या मुळांशी पुन्हा एकदा जोडलं गेलं पाहिजे आणि योगाला जीवनशैलीचा एक अविभाज्या भाग बनवायला हवा.

योगामुळे किती दिवसात फरक पडतो? योग एक्सपर्ट आणि जोगा वेलनेसचे सीईओ आणि सह-संस्थापक निमिष दयालू यांनी सांगितले की, योगाचे फायदे पाहण्यासाठी आपण 30 दिवस नियमितपणे याचा सराव केला पाहिजे. त्यासाठी जीवनशैलीत शिस्त आणि दृढनिश्चय आणणे अत्यंत आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, ’30 डे योगा चॅलेंज’ घेतल्याने आश्चर्यकारक परिणाम मिळू शकतात.

सर्वात मोठ्या समस्येवर उपाय

निमिष दयालू यांच्या मते तणाव हा शरीराचा सर्वात मोठा शत्रू आहे. मात्र योगाच्या मदतीने यासारख्या अनेक गंभीर आजारांवर उपचार करता येतात. योग केल्याने काही दिवसांतच शरीरातील एंडोर्फिनची पातळी वाढू लागते, स्नायू मजबूत होतात, मेटाबॉलिज्म आणि मानसिक आरोग्य सुधारते.

हेही वाचा :  शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट! आता वर्षातून 2 वेळा बोर्डाची परीक्षा

(वाचा :- Cancer Early Symptoms: सकाळी सकाळी शरीरात दिसतात कॅन्सरची ही 3 भयंकर लक्षणं, हे दुसरं लक्षण आहे जीवावर बेतणारं)

30 दिवसांत वाढेल ताकद आणि लवचिकता

30-

योगासनांच्या नियमित सरावाने शरीर ताणण्यास मदत होते. तुम्हाला शरीरात लवचिकता हवी असेल, तर तुम्ही नियमितपणे योगाभ्यास करत राहणे महत्त्वाचे आहे. स्नायूंच्या हालचालीसाठी शरीरात हालचाल चालू असणे देखील आवश्यक आहे. संयम ठेऊन या योगाभ्यासासाठी थोडा वेळ काढला तर शरीरातील दिसणारे बदल आणि क्षमता पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

(वाचा :- करोनाच्या सर्वात खतरनाक वेरिएंटची भारतात एंट्री, विषाणू हवेत पसरले असून WHO ने दिला धोक्याचा इशारा, वाचा लक्षण)

इम्युनिटी वाढते

योगाभ्यास केवळ तुमची शारीरिक क्षमताच नाही तर तुमच्या दृढनिश्चयाचीही परीक्षा घेतो. परिणामी, पॅरासिम्पेथेटिक (parasympathetic) मज्जासंस्था तुमच्या शरीराला आराम आणि शांत करते. अनुकंपी तंत्रिका तंत्र शरीराच्या लढण्याच्या क्षमतेशी जोडलेले आहे, त्याच्या योग्य कार्यासाठी जीवनशैली अॅक्टिव्ह असणे आवश्यक आहे. अन्यथा मेंदूमध्ये तणाव निर्माण होतो आणि शरीरावर सूज येऊ लागते.

(वाचा :- Dangal सिनेमातील Fatima Sana Shaikh मेंदूच्या भयंकर आजाराने ग्रस्त, दिसतात ही लक्षणं, किती घातक आहे हा आजार..?)

हेही वाचा :  Holi 2023: होळी खेळल्यानंतर केसांची लागतेय वाट? सुरक्षित ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय आणि राखा केसांची निगा

मिळेल शांती

अगदी काही दिवसांच्या योगाभ्यासाने तुमचे मन पूर्वीपेक्षा खूप शांत आणि त्रास, समस्यांमधून मुक्त होईल. तुम्ही शरीराच्या ऊर्जेचा योग्य दिशेने वापर करू शकाल. एका ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता केवळ योगाद्वारे प्राप्त आणि विकसित केली जाऊ शकते. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मेंदूला वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रशिक्षण देऊ शकता.

(वाचा :- या डाळीने बनवलेला इडली व डोसा खाणा-यांनो सावधान, फुफ्फुसापर्यंत पसरतं ‘विष’, आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितला उपाय)

FAQ – प्रश्नोत्तर

faq-

सकाळी उठल्यानंतर कोणता व्यायाम करावा?

सकाळी कोणताही व्यायाम करता येतो. पण योग केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही समान प्रमाणात निरोगी राहते.

योगासने करून काय फायदा होतो?

योगासने केल्याने स्नायू शिथिल होतात, गाढ झोप लागते, तणाव कमी होतो आणि हृदय व मेंदूच्या आजारांचा धोका कमी होतो.

(वाचा :- रात्री लागत नाही सुखाची झोप? मग डॉक्टरकडे जाण्याआधी सुधारा या 5 सवयी, वाचेल हजारो रूपये फी व येईल गाढ शांत झोप)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेही वाचा :  विस्कटलेले केस, हाय हिल्स अन् शॉर्ट ड्रेस, काजोलची लेक न्यासा देवगणचा लुक चर्चेत

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध …