Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत गद्दारी केली – जेपी नड्डा

Maharashtra Political News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपसोबत गद्दारी केली, अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (Maharashtra Politics) असली असली होता है, और नकली नकली, असा टोलाही त्यांनी ठाकरे यांना लगावलाय. संभाजीनगरमध्ये भाजपची सभा पार पडली. यावेळी भाजपने आगामी लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकले. मात्र, संभाजीनगर सभेच्यावेळी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेताना मोठी चूक केली. यावरुन ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल चढविण्यात आला आहे.

 जेपी नड्डा यांच्यावर शिवसेनेचा निशाणा  

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी चंद्रपूर आणि संभाजीनगर येथील दोन सभांना संबोधित करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी एक चूक झाली. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे ( BalaSaheb Thackeray) यांच्याऐवजी माजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुख बाळासाहेब देवरस (Balasaheb Deoras) यांचे नाव घेतले. शिवसेनेने (Shiv Sena Uddhav BalaSaheb Thackeray) नड्डा यांची खिल्ली उडवली आहे.

हेही वाचा :  Maharashtra Politics : फडतूस बोलण्यामागचा माझा उद्देश काय होता? भर सभेत उद्धव ठाकरे यांचा जाहीर खुलासा

काय म्हणाले भाजप अध्यक्ष नड्डा?

आपल्या भाषणात नड्डा म्हणाले, ‘ठाकरे यांनी सत्तेच्या लालसेपोटी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला आणि ज्यांच्या विरोधात बाळासाहेब देवरस आयुष्यभर लढले त्यांना साथ दिली. स्वर्गीय देवरस हे आरएसएसचे तिसरे सरसंघचालक होते.

अंबादास दानवे यांचे नड्डांना प्रत्युत्तर

नड्डा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे  (Shiv Sena Uddhav BalaSaheb Thackeray) अंबादास दानवे यांनी महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्यापूर्वी त्यांचे नाव काय हे शिकले पाहिजे.

दानवे यांनी ट्विट केले की, ‘नड्डाजी, पुढच्या वेळी महाराष्ट्रात या, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचे नाव शिका. आज तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांना बाळासाहेब देवरस म्हणता. ज्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव माहीत नाही ते त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊ शकत नाहीत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …