Free Condom : मेडिकलमधून फुकट कंडोम घेऊन जा; 18 ते 25 वयोगटातील तरुणांसाठी सरकारची योजना

Free Condom In France : फ्रान्स सरकारने तरुणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. या योजने अंतर्गत 18 ते 25 वयोगटातील तरुणांना कंडोमचे मोफत वाटप केले जात आहे(Free Condom In France). लोकसंख्या नियंत्रणासह लैंगिक संक्रमित संसर्गाचा (एसटीआय) प्रसार रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष  इमॅन्युएल मॅक्रॉन(French President Emmanuel Macron) यांनी या योजनेची घोषणा केली. 

डिसेंबर महिन्यात तरुणांच्या आरोग्याविषयी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या  कार्यक्रमात ही घोषणा जाहीर करताना 1 जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार असल्याचे  फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष  इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले होते. त्यानुसार फ्रान्समध्ये याची अमंलबजावणी सुरु झाली आहे. 

फ्रान्समध्ये अद्याप लैंगिक शिक्षणाबाबत अनेक गैरसमज आहे. तसेच फ्रान्सच्या पब्लिक हेल्थ अहवालात धकक्कादायक वास्तव समोर आले. फ्रान्समध्ये  लैंगिक संबधातून होणाऱ्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे पसरणाऱ्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने मोफत कंडोमचे वाटप करण्याचे पाऊल उचलले आहे. 

वर्ष 2020 आणि 2021 मध्ये एचआयव्हीचे 5000 नवीन रुग्ण आढळले. यामध्ये 15 टक्के असे लोक होते ज्यांचे वय 26 वर्षांपेक्षा कमी होते. यामुळेच एचआयव्ही संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी  18 ते 25 वयोगटातील तरुणांमध्ये जनजागृती करण्यासह त्यांना कंडोम वापरण्यास सुरुवात करावी यासाठी मोफत कंडोमचे वाटप करण्यात येत आहे. यामुळे लोकसंख्या नियंत्रीत येईलचं त्यासह लैंगिक संबंधांमुळे पसरणाऱ्या रोगांवर देखील अटकाव घालता येईल असा विश्वास फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष  इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी व्यक्त केला आहे. 

हेही वाचा :  'मुस्लिमांमध्ये कंडोम वापरणाऱ्यांचं प्रमाण अधिक'; ओवेसी म्हणाले, 'मोदींना 6 भाऊ, शाहांना..'

जगभरातील विविध देशांमध्ये कंडोम बाबत वेगवेगळे नियम आहेत. आफ्रिकन देश स्वाझीलँडमध्ये कंडोमवर पूर्णपणे बंदी आहे. नायजेरिया, फिलीपिन्स, झांबिया आणि इंडोनेशिया या देशांमध्ये कंडोमचा वापर अगदी कमी प्रमाणात केला जातो. 

कंडोम वापरण्याचे फायदे

लैंगिक संबध ठेवताना  नको असलेल्या गर्भधारणेला रोखण्यासाठी अनेक जण कंडोमचा वापर करतात. कंडोमचा वापर सेफ सेक्स म्हणूनही केला जातो. कंडोममुळे एचआयव्ही आणि यौन संक्रमण जोखीम कमी करण्यात मदत होते. निरोगी लैंगिक जीवनासाठी कंडोमचा वापर करणं हा नेहमी उत्तम पर्याय ठरतो.  कंडोमच्या वापरामुळे कित्येक लैंगिक आजारांपासून संरक्षण होते. मात्र, कंडोमचा अतिरीक्त वापर देखील आरोग्यासाठी धोकादायक आहे. कंडोम वापरताना काळजी घेणेही महत्वाचे आहे. यामुळे कंडोम खरेदी केल्यावर त्याची एक्सपायरी डेट तपासून घेणे गरजेचे आहे.   

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार…सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीडमधल्या मुंढेवाडी गावातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल …

Maharastra Politics : ‘रिपोर्टला वेळ का लागला? इमान विकलं पण…’, सुनील टिंगरे यांच्यावर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

Jitendra Awhad On Sunil Tingare : ससून रुग्णालयाचा डॅाक्टर अजय तावरे याने पुण्यातील पोर्श प्रकरणातील …