Gas Cylinder Price: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा झटका, गॅस सिलिंडर महागला

Gas Cylinder Price Hike: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका बसला आहे. व्यावसायिक वापराचा गॅस सिलिंडर आज पुन्हा महागलाय. व्यावसायिक वापराचा 19.5 किलो वजनाचा गॅस सिलिंडर 25 रुपयांनी महागला आहे. तर घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर मात्र जैसे थे ठेवण्यात आलेत. व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचे दर महागल्याने आता मुंबईत  19.5 किलोंचा निळा सिलेंडर 1721 रुपयांना मिळेल. जुलै 2022 नंतर घरगुती गॅसच्या किंमती वाढलेल्या नाहीत. 

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. आजपासून सिलिंडर घेणे महाग झाले आहे. गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्ली, मुंबईपासून पाटणापर्यंत सर्वच शहरांमध्ये गॅस सिलिंडर खरेदी करणे महाग झाले आहे. कोणत्या शहरात सिलिंडरचे दर काय आहेत ते सांगू.

कोणता सिलिंडर महागला?

1 जानेवारी 2023 पासून व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीही कायम आहेत. म्हणजेच, घरगुती सिलिंडरसाठी, तुम्हाला मागील महिन्यात जितका खर्च केला होता तितकाच खर्च करावा लागेल. त्याच वेळी, व्यावसायिक सिलिंडरसाठी 25 रुपये अधिक खर्च केले जातील. 

हेही वाचा :  1 January 2023: नवीन वर्षात टोल टॅक्स, क्रेडिट कार्डसह अनेक नियमांमध्ये मोठे बदल, तुमच्या खिशावर थेट परिणाम

व्यावसायिक सिलिंडरचे दर 

 – दिल्ली – 1769
– मुंबई – 1721
 – कोलकाता – 1870
 – चेन्नई – 1917 

घरगुती सिलिंडरचे दर 

 –  दिल्ली – 1053
 – मुंबई – 1052.5
 – कोलकाता – 1079
 – चेन्नई – 1068.5 

गेल्या एका वर्षात सिलिंडर 153.5रुपयांनी महागला आहे. म्हणजेच 14.2 किलोच्या सिलिंडरच्या किंमती 6 जुलै 2022 रोजी बदलण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती 153.5 रुपयांनी वाढल्या आहेत. 

सिलिंडर कधी आणि किती रुपयांनी महाग 

2022 मध्ये मार्च महिन्यात घरगुती सिलिंडरच्या किमती 50 रुपयांनी वाढल्या होत्या. नंतर मे महिन्यात पुन्हा 50 रुपयांनी भाव वाढविण्यात आले. त्याचवेळी मे महिन्यात दुसऱ्यांदा 3.50 रुपयांनी दरवाढ करण्यात आली. यानंतर जुलैमध्ये शेवटच्या वेळी दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

दहावी नापास झाल्यावर काय करावे?

Career For 10th Fail: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी …

Pune Porsche Accident: अपघाताच्या आधीचा धक्कादायक CCTV; ‘तो’ मुलगा पोर्शेमधून उतरला अन्..

Pune Porsche Car Accident: पुण्यातील कल्याणी नगर येथे 19 मे रोजी झालेल्या भीषण अपघातानामध्ये अल्पवयीन …