Pune Crime: मुलीला लॉजवर नेले, नग्न फोटो काढले आणि तब्बल सहा महिने… UP, बिहार नाही तर पुण्यात घडली भयानक घटना

Pune Crime news : राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुणे शहर(Pune) बलात्काराच्या घटनेमुळे हादरले आहे. अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार(gang raped ) केला आहे. आरोपींनी या मुलीचे नग्न फोटो काढून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे(Crime News). या सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. अटक झालेल्या आरोपींपैकी एक आरोपी हा पीडीत तरुणीच्या परिचयाचा होता. त्यानेच आपल्या मित्राच्या मदतीने या तरुणीवर बलात्कार केला.  

आरोपीने आधी चाकूचा धाक दाखवून या मुलीचं अपहरण केलं आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढून हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर आोरीच्या सहा मित्रांनी देखील तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. ओम राजु तिंबोळे (रा. जय गणेश कॉलनी, विधाते वस्ती, औंध), जय राजु तिंबोळे, अनिल जाधव, सुनिल जाधव, शुभम आणि किरण जावळे (सर्व रा. औंध) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

हेही वाचा :  Heat Stroke : लग्न आटोपून घरी परतली अन्... उष्माघाताने घेतला तिघांचा बळी

ही घटना विशालनगर येथील लॉजवर, बाणेर येथील तुकाई मंदिर टेकडी तसेच औंधमध्ये घडली. जुलै 2022 ते 23 डिसेबर 2022 दरम्यान घडली आहे. या सहा महिन्यात पीडितेवर अनेकदा अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. सहाही आरोपींवर पोलिसांनी पॉक्सोसह अनुसूचित जाती जमाती अधिनियमानुसार (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल जाधव या व्यक्तीने 15 वर्षीय मुलीला चाकूचा धाक दाखवला. मुलीला घाबरवलं आणि तिचं अपहरण केलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढून ते फोटो आपल्या मित्रांना पाठवले. त्यानंतर तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून तिच्यावर अत्याचार केले. 23 डिसेंबर रोजी दुपारी तिला एका ठिकाणी बोलावून सहा जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या बलात्कारानंतर मुलीला त्रास होऊ लागल्याने ही घटना आईच्या लक्षात आली. आईने थेट पोलिसांत धाव घेतली आणि पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …

Godrej Family Tree : लहानपणी तुमच्याही घरात असेल या कंपनीचे कपाट, आता 14 लाख कोटींची कंपनी

देशातील सर्वात जुन्या कुटुंबांपैकी एक असलेले गोदरेज कुटुंब आज तब्बल 127 वर्षांनंतर विभक्त होणार आहे. …