Pune Crime : ‘हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट’ चालवणाऱ्या कल्याणी देशपांडेला सक्तमजुरी, कोण आहे ती?

Pune Sex Racket : कुप्रसिद्ध कल्याणी देशपांडे (Kalyani Deshpande) हिच्या आणखी सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पर्दाफाश झाला होता. ती चालवत असलेलं एक हाय प्रोफाईल सेक्स रेकेट पुणे पोलिसांनी उघडकीस आणले होते. (Kalyani Deshpande Sex Racket) त्यामध्ये शहरात वेश्या वयवसाय करणाऱ्या दोन विदेशी आणि दोन मुंबईतल्या मुलींसह एका एजंटला आणि कल्याणी देशपांडे हिला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात ती दोषी आढळली. सेक्स रॅकेटर कल्याणी तथा ​​जयश्री ऊर्फ ​​टीना उमेश देशपांडे (52) हिला पुण्यातील विशेष न्यायालयाने सात वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. 

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार दोषी

कल्याणी देशपांडे  (Kalyani Deshpande) हिला अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (MCOCA) कलमांखाली दोषी ठरवण्यात आलेले हे महाराष्ट्रातील पहिलेच प्रकरण आहे.  पुण्यातील पाषाण रोडवर राहणाऱ्या 52 वर्षीय कल्याणी देशपांडे हिचा मुख्य व्यवसाय होता वेश्याव्यवसायासाठी मुली पुरवणं. दिसायला सुसंस्कृत आणि सुशिक्षित वाटत असलेली ही महिला मानवी तस्करीमध्ये अट्टल गुन्हेगार आहे. अनैतिक कामासाठी महिलांचा वापर करण्यामध्ये ती माहीर आहे. कल्याणी देशपांडे पुण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत होती. 

हेही वाचा :  Gautami Patil : कापसाला पाणी बकेटने मारतील पण... डान्सचे ठुमके कमी करा म्हणत शेतकऱ्याचे गौतमी पाटीलला पत्र

सामाजिक सुरक्षा शाखेकडून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

सामाजिक सुरक्षा शाखेने तिच्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. पुण्याच्या भुसारी कॉलनीतल्या एका इमारतीमध्ये हा व्यवसाय सुरु होता. एक डमी गिऱ्हाईक पाठवून पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला. या कारवाईत मुंबईतल्या दोन तर उझबेकिस्तानातल्या दोन मुलींना अटक करण्यात आली होती. कल्याणी देशपांडेचा हा अशा प्रकारचा पहिलाच गुन्हा नव्हता. अनैतिक व्यापाराप्रकरणी तिला 2000 साली पहिल्यांदा अटक झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत तिच्यावर खुनाच्या दोन गुन्ह्यांसह तब्बल 21 गुन्हे दाखल आहेत.

 जामिनावर सुटताच कल्याणीचा गोरखधंदा पुन्हा सुरु

2010 साल वगळता दर वर्षी किमान एक तरी गुन्हा कल्याणी देशपांडे हिच्यावर दाखल आहे. मात्र, धक्क्कादायक बाब म्हणजे यापैंकी एकाही खटल्याचा निकाल लागला नव्हता. त्यामुळे तिला अजून एकदाही शिक्षा झालेली नव्हती. तिच्या विरोधातले खटले न्यायालयात प्रलंबित राहत असल्यानेच ती पुन्हा पुन्हा असे गुन्हे करु शकते. अशा परिस्थितीत केवळ अटक करणं किंवा फारतर तडीपार करणं, यापलीकडची कारवाई पोलीस करु शकत नव्हते. जामिनावर सुटताच कल्याणीचा गोरखधंदा पुन्हा सुरु होत होता. आता तिला शिक्षा झाली आहे.

हेही वाचा :  "शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरलीच नाहीत, मग...", जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत!

कल्याणी पुण्यातील टॉप ‘दलाल’ बनली. तिच्यावर सुमारे 24 गुन्हे दाखल आहेत. रिपोर्ट्सनुसार, कल्याणीचे नेटवर्क अजय पाटील, शक्ती थापा, मंगेश रुद्राक्ष आणि राजू बंगाली यांसारख्या गुन्हेगारांपेक्षा खूप मोठे असल्याचे सांगितले जात आहे. तिच्या बंगल्यातून ‘व्हीनस एस्कॉर्ट्स’ नावाची एस्कॉर्ट एजन्सी चालवली जात होती. कल्याणीचा बंगला वेश्याव्यवसाय आणि गुन्ह्यांसाठी कुप्रसिद्ध होता. 

काही हाय-प्रोफाइल ग्राहकांचा समावेश

डिसेंबर 2007 मध्ये त्यांचे जवळचे सहकारी अनिल ढोले यांची याच बंगल्यात हत्या करण्यात आली होती. मुंबईतून वेश्याव्यवसायासाठी कॉल गर्ल्स आणण्यासाठी ढोले हा एजंट म्हणून काम करत असे. ढोलेच्या मृत्यूनंतर कल्याणीच्या कारवाया वाढल्या. तिने पुणे आणि इतर भागात वेश्याव्यवसायासाठी देश-विदेशातील मुलीं पुरवल्याचा केल्याचा आरोप आहे. कल्याणीने हॉटेलवाले आणि संघटित गुन्हेगारी सिंडिकेट यांच्यात दलाली करत मजबूत नेटवर्क निर्माण केल्याचा आरोप आहे. तिच्याकडे खूप मोठा क्लायंट बेस होता. ज्यात काही हाय-प्रोफाइल ग्राहकांचा समावेश होता. यापूर्वीही कल्याणीला अनेकवेळा अटक करण्यात आली होती. तिच्यावर मुंबईतही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

जामिनावर सुटल्यावर पुन्हा सेक्स रॅकेट सुरु

 31 मार्च 2012 रोजी पुण्यातील हिंजवडी पोलिसांनी कल्याणीला वेश्याव्यवसाय प्रकरणात अटक केली. एप्रिलमध्ये राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) हिंजवडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब सुर्वे आणि हवालदार मोहम्मद हनिफ अब्बास शेख यांना कल्याणीचा चुलत भाऊ जतिन चावडा यांच्याकडून 40,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक केली होती. जामिनावर सुटल्यावर कल्याणीने तिचे सेक्स रॅकेट पुन्हा चालवले होते. 

हेही वाचा :  मारबर्ग व्हायरसने 9 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर WHO हादरलं, चालता चालता सुरू होतात 'ही' 2 लक्षणं

कल्याणीला सात वर्ष सक्तमजुरी आणि 10 लाख रुपयांचा दंड 

अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) च्या कलमांखाली आरोपीला दोषी ठरवण्यात आलेले हे महाराष्ट्रातील पहिलेच प्रकरण आहे. पुण्यातील वेश्या व्यावसायच्या माध्यमातून आपले आर्थिक बस्तान बसविणाऱ्या आणि संघटितपणे गुन्हेगारी करणाऱ्या कुख्यात कल्याणी देशपांडे हिच्यासह दोघांना विशेष न्यायालयाने सात वर्ष सक्तमजुरी आणि 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आहे. ही रक्कम न भरल्यास 1 वर्षांचा कारावास आणखी भोगावा लागणार आहे. पिटा आणि मोक्काच्या गुन्ह्यातील झालेली ही पहिलीच शिक्षा असल्याचे बोलले जात आहे. अतिरिक्त सरकारी वकील विजय फरगडे यांनी या प्रकरणात युक्तीवाद करताना दोघांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …