मुलांसाठी दैनंदिन आयुष्यात किती प्रथिनांची गरज? वयोगटानुसार पालकांनी जाणून घ्या

जीवनाचा मुख्‍य घटक प्रथिने शरीराच्‍या प्रत्‍येक पेशीमध्‍ये असतात. आपल्‍या शरीराच्‍या वजनापैकी जवळपास १८ ते २० टक्‍के प्रथिने असतात. दैनंदिन आहारामध्‍ये प्रथिने आवश्‍यक असताना देखील बहुतांश भारतीय व्‍यक्‍तींमध्‍ये प्रथिनांची कमतरता आढळून येते. इंडियन मार्केट रिसर्च ब्‍युरो (आयएमआरबी) ने केलेल्‍या सर्वेक्षणानुसार जवळपास ७३ टक्‍के शहरी व्‍यक्‍तींमध्‍ये प्रथिनांची कमतरता आहे आणि त्‍यांच्‍यापैकी ९३ टक्‍के व्‍यक्तींना त्‍यांच्‍या दैनंदिन प्रथिने आवश्‍यकतांबाबत माहीत नाही. लहान मुलांना नेमके किती ग्रॅम्स प्रथिनांची गरज भासते याचा तक्ता आम्हाला डॉ. रितिका समाद्दार, मुख्य आहारतज्ज्ञ, मॅक्स हेल्थकेअर, साकेत, दिल्ली यांच्याकडून मिळाला आहे. पालकांनी ही माहिती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

प्रथिनांची गरज कशासाठी

प्रौढ म्हणून आपल्याला स्नायूंच्या बळकटीसाठी प्रथिनांची गरज असते, वजन कमी करण्यास मदत होते, तसेच रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते आणि सर्व पेशींसाठी आवश्‍यक घटक आहे. वयोवृद्ध व्‍यक्‍तींना सारकोपेनिया (स्नायूंचे नुकसान) टाळण्यासाठी प्रथिने अत्यंत आवश्यक आहे आणि ते आजारपणानंतर जलद आणि लवकर बरे होण्यास मदत करते. पण मुलांना लहानपणापासूनच योग्य प्रमाणात प्रथिने मिळाली तर मोठेपणी त्यांना कमी प्रमाणात त्रास होतो. तरीही प्रश्न पडतो की मग प्रथिनांच्‍या आवश्‍यकतेसाठी आरडीए काय आहे? वय, लिंग, व्‍यायाम पद्धत आणि आरोग्‍याच्‍या स्थितीनुसार गरज विभिन्‍न असते. एनआयएन २०२० ने अनेक शिफारशीही दिल्‍या आहेत.

हेही वाचा :  प्राजक्ता माळीच्या भाळी चंद्रकोर, नाकात नथ नऊवारीत मराठमोळा साज

कोणत्या वयोगटानुसार कशी असावी प्रथिने

वयोगट प्रथिनांचे प्रमाण

पुरूष – ५५ ग्रॅम

महिला – ४५ ते ५० ग्रॅम

मुले (१ ते ३ वर्षे) – १० ते १५ ग्रॅम

मुले (४ ते ९ वर्षे) – १५ ते २५ ग्रॅम

मुले – १० ते १२ वर्षे – ३२.८ ग्रॅम

मुली – १० ते १२ वर्षे – ३१.८ ग्रॅम

मुले – १३ ते १५ वर्षे – ४४.९ ग्रॅम

मुली – १३ ते १५ वर्षे – ४३.२ ग्रॅम

मुले – १६ ते १८ वर्षे – ५५.४ ग्रॅम

मुली – १६ ते १८ वर्षे – ४६.२ ग्रॅम

*भारतीयांकरिता आरडीएचा एनआयएन सारांश – २०२०

सरासरी प्रथिनांची गरज

सरासरी भारतीय प्रौढ व्यक्तीसाठी प्रथिनांची दैनंदिन गरज (आरडीए) ०.८-१.० ग्रॅम प्रति किलो वजन (दररोज ५०-६० ग्रॅम प्रथिने) असते. प्रति जेवण १५-२० ग्रॅम उच्च-गुणवत्तेचे प्रथिने सेवन केल्‍यने व्‍यक्‍तीची दैनंदिन गरज भागवता येते. गरज, म्हणजे प्रत्येक आहारामध्‍ये एक-चतुर्थांश प्रथिने असले पाहिजे. प्रथिनांची गुणवत्ता देखील खूप महत्त्वाची आहे. कोंबडी, बदक, टर्की आणि अंडी यांसारखे पोल्‍ट्री हे जैवउपलब्ध प्रथिनांचे सर्वोत्तम स्त्रोत आहेत आणि सर्व आहारातील आवश्यक अमीनो अॅसिड त्यांच्यामध्ये मुबलक प्रमाणात असल्याने त्यांना संपूर्ण प्रथिने म्हटले जाते. कोंबडी, टर्की, बदक व अंडी यांसारखे संपूर्ण प्रथिन स्त्रोत प्रमाण व गुणवत्तेनुसार उच्च असतात आणि १०० टक्‍के पचतात. ते निरोगी प्रथिने, चरबी आणि सूक्ष्म पोषक तत्वांनी परिपूर्ण आहेत आणि त्यातील उच्च प्रथिने घटकामुळे ते रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे उत्कृष्ट अन्न बनते. प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत असण्यासोबत त्‍यांच्‍यामध्‍ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी १२, झिंक, लोह, सेलेनियम सारखे सूक्ष्म पोषक घटक देखील असतात.

हेही वाचा :  'भटकती आत्मा'च्या प्रश्नावर शरद पवारांचं मिश्किल हास्य, पंतप्रधान मोदींना स्पष्टच म्हणाले...

(वाचा – डायबिटीससह अन्य आजारांवरही गुणकारी आहे आळशी, जाणून घ्या ५ फायदे)

दैनंदिन आहारात मुलांसाठी प्रथिनस्रोतांचा करा समावेश

आहारामध्‍ये पुरेशा प्रमाणात प्रथिने असण्‍यासाठी दैनंदिन आहारामध्‍ये प्रथिनेस्रोतांचा समावेश करा. आरोग्‍यदायी ब्रेकफास्‍टसह दिवसाची सुरूवात करा आणि त्‍यामध्‍ये दररोज अंडी किंवा दुधाचा समावेश करा. मुख्‍य आहारामध्‍ये काही प्रथिनेयुक्‍त पदार्थ जसे मसूर किंवा चिकन/टर्की/बदक यांसारखे काही प्रथिनयुक्त अन्न समाविष्ट केले पाहिजे. तसेच प्रथिनेयुक्त पदार्थांचे स्नॅक करा. म्हणून फक्त प्रमाणावर नाही तर प्रथिनांच्या गुणवत्तेवर देखील लक्ष केंद्रित केले पाहिजे.

मात्र वर दिलेल्या तक्त्यापेक्षा अधिक प्रथिनांचा समावेश करू नका. मुलांना योग्य आहार आणि प्रमाणात आहार देण्याची गरज आहे. डॉक्टरांनी दिलेल्या या गोष्टी पालकांनी लक्षात ठेवा आणि सहसा जंक फूड अथवा मुलांना अति आहार देणेही टाळा. याचा मुलांच्या शरीरावर वाईट परिणाम होण्याचीही शक्यता असते.

(फोटो क्रेडिटः Pexels)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?

Weather Updates: मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्रात गेल्या काही …

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …