“काही लोक जेलमध्ये सकाळची पत्रकार परिषद घ्यायची परवानगी मागतील”, मनसेची खोचक पोस्ट चर्चेत, टोला नेमका कुणाला? | MNS Sandip Deshpande Facebook post taunts Sanjay raut over press conference


मनसेचे संदीप देशपांडे यांची फेसबूक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

पुण्यात झालेल्या मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी संजय राऊतांची नक्कल केली होती. त्यावर संजय राऊतांनी “आमचं राजकारण नकलांवर चालत नाही”, अशा शब्दांत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर पुन्हा राज ठाकरेंनी एका कार्यक्रमाच्या उद्घाटनात संजय राऊतांना टोला लगावला. एकंदरीतच मनसे आणि संजय राऊत यांच्यात कलगीतुरा रंगल्याचं दिसून येतंय. अशातच मनसेचे संदीप देशपांडे यांची फेसबूक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

“संजय राऊतांनी आता एकांतात…”, राज ठाकरेंचा खोचक सल्ला; नकलांबाबत मारलेल्या टोमण्यावर दिलं प्रत्युत्तर!

जेल मध्ये गेल्यावर काही लोक घरचं जेवण मागतात, काहींना पुस्तकं लागतात, काहींना औषध लागतात. मात्र, यापुढे काही लोक जेलमध्ये सकाळची पत्रकार परिषद घ्यायची परवानगी मागतील, असा टोला संदीप देशपांडे यांनी फेसबूक पोस्ट करत लगावला आहे. त्यामुळे हा टोमणा नेमका कुणासाठी अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांतील राज्यातील राजकारण आणि टोमण्यांना प्रत्युत्तर पाहिलं असता देशपांडेंनी हा टोला शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना लगावला असल्याची चर्चा सुरू आहेत.

हेही वाचा :  Shiv Sena Crisis : सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात 'सर्वोच्च' सुनावणी; आत्तापर्यंत काय घडलं? जाणून घ्या

हा टोला संजय राऊत यांच्यासाठीच असल्याची चर्चा रंगण्यामागे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे पत्रकार परिषद. संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पत्रकार परिषद घेत आहेत. तसेच रोज सकाळी ते न चुकता माध्यमांशी संवाद साधतात. त्यामुळे देशपांडेनी हा टोला संजय राऊत यांनाच लगावल्याचं दिसंतय.  



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …

अजित पवारांना वाहतुकीच्या नियमाचा विसर, पुण्यात उलट दिशेने चालवली वाहने

Ajit Pawar Violated Traffic Rules : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात वाहतुकीचे नियम मोडल्याचे समोर आलं …