केस गळतीपासून कायमस्वरूपी सुटका हवीय? मग कढीपत्त्याचे पाण्याचा करा असा वापर

प्रत्येक महिलेला लांबसडक केस असावेत असे वाटत असते. पण अनेक काही कारणांमुळे केस गळतात किंवा कोरडे होतात. तुमची ही समस्या जेवणातील कढीपत्ता दूर करु शकतो. कढीपत्ता केसांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर असल्याचे सिद्ध होते आणि या पानांचा वापर करणे देखील सोपे आहे. हेअर वॉशमध्ये कढीपत्ताचा वापर करण्यासाठी याचे पाणी बनवता येऊ शकते. यासाठी डॉ. हंसा योगेद्र यांनी काही उपाय सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊयात कढीपत्त्याचे फायदे. (फोटो सौजन्य : @Istock)

​केस धुण्यासाठी कढीपत्त्याचे पाणी

केसांच्या वाढीसाठी कढीपत्ताचा उपयोग केला जातो. कढीपत्त्याचे पाणी तयार करण्यासाठी, पाण्यात १५ ते २० कढीपत्ता उकळण्यासाठी ठेवा. जेव्हा पाणी उकळून अर्धे होईल तेव्हा समजून घ्या की तुमच्या कढीपत्त्याचे पाणी तयार आहे. हे पाणी थंड करा आणि नंतर शॅम्पू केल्यानंतर या पाण्याने केस धुवा.

​कुरळ्या केसांवर फायदेशीर असा करा वापर

कुरळे केसांवर कढीपत्त्याचे पाणी वापरता येते. हे पाणी कुरळ्या केसांना मऊ करते आणि त्यांना सांभाळणे सोपे जाते. तसेच या पाण्याने कोरड्या केसांची समस्या दूर होते. (वाचा :- Hair Fall Solution : ८ दिवसात केसांचं गळणं होईल कमी,घनदाट केसांसाठी Baba Ramdev नी सांगितले खास उपाय)

हेही वाचा :  मुळापासून उपटून टाका घाणेरडं कोलेस्ट्रॉल, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले १० टिप्स

केसांच्या वाढीसाठी करा हे उपाय

​केस काळे राहतात

कढीपत्त्याची पेस्ट बनवून केसांना लावल्यास केस पांढरे होण्यापासून सुटका मिळते. तसेच कढीपत्त्याच्या पाण्याने केस नियमित धुतल्याने केस पांढरे होण्याची समस्या होत नाही. यामुळे केस हळूहळू काळे होण्यासही मदत होते.

​कोंडा दूर राहतो

थंडीचं हवामानात केसांमध्ये कोंडा पाहायला मिळतो. कढीपत्त्याचे पाणी कोंडा दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. या पाण्याने केसांमधला कोंडा दूर होतो. (वाचा :- केस गळणं थांबण्यासाठी रामदेव बाबांनी सांगितले खास उपाय, केस भराभर वाढतील)

​असे तयार करा तेल

कढीपत्त्याचे तेल तयार करण्यासाठी तेल गरम करुन त्यामध्ये कढीपत्ता टाका हे तेल चांगले काळे होऊन द्या. तयार झालेल्या तेलाचा वापर आठवड्यातून दोन वेळा करा. यामुळे केस वाढण्यास मदत होईल त्याच प्रमाणे नवीन केस वाढण्यास मदत होईल. (वाचा :- दर 15 दिवसांनी फेशियल करणे गरजेचे आहे का ? वाचा डॉक्टरांचे म्हणणे )

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …