Gravton Quanta इलेक्ट्रिक बाइकची चर्चा, 80 रुपयांमध्ये धावणार 800 किमी

Gravton Quanta Electric Bike: पेट्रोल-डिझेलची वाढत्या किमती पाहता इलेक्ट्रिक दुचाकीची मागणी वाढली आहे. हैदराबाद-आधारित स्टार्टअप इव्ही ब्रँड Gravton Motors कंपनी भारतात Quanta इलेक्ट्रिक बाइकची विक्री करते. कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक बाइक केवळ 80 रुपयांच्या खर्चात 800 किमी पर्यंत धावते. या इलेक्ट्रिक बाइकला खास डिझाइन देण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे कन्याकुमारी ते खारदुंग प्रवास करणारी ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक दुचाकी आहे. आज आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिक बाइकची संपूर्ण माहिती देणार आहोत. 

ग्रॅव्हटन क्वांटामध्ये काय विशेष आहे?

या बाइकमध्ये स्वॅप करण्यायोग्य बॅटरी आहे. ही बाइक 320 किमीची रेंज देते. यात 3KW BLDC मोटर आहे. मोटर 170Nm टॉर्क जनरेट करते. बाइकचा टॉप स्पीड 70 किमी प्रतितास आहे. यात 3 kWh डिटेचेबल बॅटरी मिळते, जी एका चार्जवर 150 किमीची रेंज देते. यामध्ये एकाच वेळी दोन बॅटरी ठेवता येतात. यामुळे रेंज 320KM पर्यंत वाढते. म्हणजे पहिली बॅटरी संपल्यावर ती बदलता येते.

1. टू-मोड चार्ज: बॅटरी जलद चार्जिंगद्वारे 90 मिनिटांत चार्ज केली जाऊ शकते. ते 1 किमी/मिनिट दराने चार्ज होते. सामान्य मोडमध्ये बॅटरी 3 तासांत चार्ज करता येते.

हेही वाचा :  Gmail वर येणाऱ्या Yellow Arrow चा काय अर्थ?, जाणून घ्या काय होतो फायदा

2. कंपनीने पाच वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सहज बदलण्याची सुविधा दिली आहे.

बातमी वाचा- पूर्ण चार्जवर Mercedes-Benz Vision EQXX धावणार 1000 किमी, जाणून घ्या इतर वैशिष्ट्ये

3. स्मार्ट अॅप – रस्त्याच्या कडेला सहाय्य, मॅपिंग सर्व्हिस स्टेशन, रिमोट लॉक/अनलॉक आणि लाईट चालू/बंद करणे यासारख्या सुविधा स्मार्ट अॅपद्वारे पुरवल्या जातात.

4. रेड, व्हाइट आणि ब्लॅक अशा तीन रंगात ही गाडी उपलब्ध आहे.

5. कंपनीच्या वेबसाइटवर या गाडीची किंमत 1,15,000 रुपये आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Interesting Facts : विमानाच्या इंजिनावर असणाऱ्या त्या लहानशा पंखांचा नेमका काय वापर?

Interesting Facts : विमान प्रवास हा पहिलावहिला असो किंवा मग अगदी सराईताप्रमाणं नेहमीच्या नेहमी केला …

देशभर चर्चेत असलेल्या पोर्श कारची किंमत किती? स्पीड, मायलेज सर्वच जाणून घ्या…

Pune Accident News:  पुण्यातील कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणामुळं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पोर्श …