डिलिव्हरीनंतर कसे स्वतःला जपायला हवे याची माहिती

डिलिव्हरीनंतर बाळंतिणीने काय काळजी घ्यावी

बाळाची डिलिव्हरी साधारणतः दोन पद्धतीने होते. एक Normal Delivery आणि एक Cesarean Delivery. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिलिव्हरीनंतर पुढचे २४ तास बाळाला आणि स्वतःला खूप जास्त जपावे लागते. यासाटी नक्की काय करायचे ते जाणून घ्या.

  • नॉर्मल अथवा सीझर दोन्ही पद्धतीच्या डिलिव्हरीमध्ये टाके हे घातलेच जातात. त्यामुळे या टाक्यांना जपावे लागते. कोणत्याही पद्धतीचा हलगर्जीपणा यामध्ये करून चालत नाही
  • नॉर्मल डिलिव्हरी होताना योनीमार्गामध्ये टाके घातले जातात आणि हे टाके कितीही कमी आणि लहान असले तरीही त्याची काळजी घ्यावी लागते. हे लवकर बरे होतात. साधारणतः दोन ते तीन दिवस लागू शकतात. असे असले तरीही साधारण दीड महिना तरी कोणत्याही जड वस्तूंना हात लावू नका आणि उचलू नका. किमान ४० दिवस तरी स्वतःला जपा
  • बाळ झाल्यापासून २४ तासात तुम्ही जास्त हालचाल करू नये. तसंच योनीमार्गात खाज येत असल्यास, त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तपासणी करून घ्या
  • तर सीझर डिलिव्हरी झालेल्या महिलांना पहिल्या २४ तासामध्ये काहीच कळत नाही. कारण त्यांना दिलेल्या इंजेक्शनचा परिणाम असतो आणि हा पहिला दिवस त्यांचा बेशुद्धीमध्ये जातो अथवा काही तासाने शुद्धीत आल्यानंतरही इंजेक्शनचा प्रभाव असल्यामुळे वेदना जाणवत नाहीत. साधारण दुसऱ्या दिवशीपासून वेदना जाणवतात. पण सर्वात जास्त त्रास याच महिलांना होतो
हेही वाचा :  Jyotika Dilaik Wedding: लाल लेहंग्यात सौंदर्याने न्हाऊन निघाली रूबिना दिलैकची लहान बहीण

(वाचा – प्रेग्नेंसीमध्ये आयर्नची गोळी खाल्ल्याने बाळाचा रंग बदलतो? जाणून घ्या गायनेकोलॉजिस्ट काय म्हणतात)

नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतिणीने घ्यायची काळजी

नॉर्मल डिलिव्हरीमध्ये थकवा येतो. मात्र सीझरप्रमाणे अति त्रास होत नाही. टाके घातल्यामुळे काळजी घ्यावी लागते. मात्र हे टाके दुखत नाहीत. साधारणतः आठवडाभरात या महिला कामांना सुरूवात करू शकतात. मात्र अगदी हलकी स्वतःची कामे. किमान दीड महिन्यापर्यंत या महिलांनी आपल्या टाक्याची काळजी घ्यावी. तसंच कोणतेही जड सामान उचलू नये. हवेखाली बसू नये. व्यवस्थित शेक घ्यावा. बाळाला दूध देता येईल असेच अन्नपदार्थाचे सेवन करावे. लगेच तेलकट अथवा फास्टफूड खाऊ नये.

(वाचा – गरोदरपणात मधुमेहाने ग्रस्त आहात? गर्भावस्थेतील मधुमेहाची कशी घ्याल काळजी)

सीझर डिलिव्हरी झालेल्या बाळंतिणीने घ्यायची काळजी

सीझर डिलिव्हरी झाल्यानंतर पहिले ७ दिवस हे तर स्वतःला सावरण्यातच जातात. नीट उठता येत नसल्यामुळे खूपच त्रास होतो. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या महिलांच्या तुलनेत जास्त काळजी घ्यावी लागते.

  • सीझर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कॅथटर काढून टाकल्यावर लवकरात लवकर हालचाल करण्याचा प्रयत्न करा. नाहीतर अंग आखडते आणि उठता येत नाही
  • यामध्ये वेदना होतात पण तरीही दोन दिवसांच्या कालावधीत तुम्ही कोणाचाही आधार न घेता टॉयलेटला जाण्याचा प्रयत्न करा. अगदीच जमत नसेल तर कोणाची तरी मदत घ्या. टॉयलेटला जाताना अथवा चालताना टाक्यांवर दबाव येणार नाही याची काळजी घ्या
  • सीझर झालं असेल तर तुम्हाला दोन दिवस पाणी अथवा कोणताही पदार्थ खाण्यासाठी दिला जात नाही. जोपर्यंत तुम्हाला नैसर्गिकरित्या शौचाला होत नाही तोपर्यंत कॉफीदेखील मिळत नाही. मात्र कॉफीनंतर तुम्ही लगेच खाऊ नका
  • जेवणात मसालेदार पदार्थ खाऊ नका. साधं जेवण किमान एक महिना जेवा
  • साधारण सहा महिने तरी कोणतेही वजनदार पदार्थ उचलू नका. टाक्याची जखम ओली असते आणि सीझर झाले असेल तर ही जमख भरण्यासाठी वेळ लागतो
  • साधारण दोन ते तीन महिने घट्ट जीन्स अथवा कोणतेही घट्ट कपडे घालू नका. त्याचा तुमच्या टाक्यांवर दबाव येऊन टाके निघण्याची शक्यता असते
  • तसंच पोट नैसर्गिकरित्या कमी होईल याचा प्रयत्न करा. पण बाळाच्या जन्मानंतर लगेच व्यायाम करू नका किंवा बाळाकडे आणि आपल्या तब्बेतीकडे जास्त लक्ष द्या
  • जखम भरत नाही तोपर्यंत अति गरम पाण्याचा आंघोळीसाठी अजिबात वापर करू नका
  • तसंच दिवसभरात ८-९ ग्लास पाणी प्या. कारण या कालावधी बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याची शक्यता असते. पाणी नीट पित राहिल्यास हा त्रास होत नाही
  • निदान सहा आठवडे तरी कोणत्याही प्रकारचा शरीरसंबंध ठेऊ नका. यामुळे तुमच्या शरीराराव दबाव येऊ शकतो
  • जखम पूर्ण होईपर्यंत तुम्हाला जर ताप आला अथवा सतत मळमळ होत असेल, डोकं दुखत असेल तर याकडे दुर्लक्ष अजिबात नका करू
  • आपल्या मर्जीने कोणतेही औषध अजिबात घेऊ नका
हेही वाचा :  निवडणूक प्रचारात पेनड्राइव्ह दाखवणार, 'त्या' भाजप नेत्याचं नावही सांगणार- अनिल देशमुख

नॉर्मल वा सीझर डिलिव्हरीनंतर बाळंतिणीला बाळाबरोबरच स्वतःला खूपच जपावे लागते. या सोप्या टिप्सचा वापर नक्की करा. या टिप्स स्वानुभावावरून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही या नक्की वापरू शकता. या टिप्सचा वापर करणे अजिबातच धोकादायक नाही.

(वाचा – किती दिवसात गरोदर असल्याचे कळते, काय आहेत गर्भधारणा झाल्याची लक्षणे)

(फोटो क्रेडिटः Freepik.com)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, मतदान सुरु असतानाच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी

Loksabha 2024 Baramati : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. राज्यातील अकरा मतदारसंघात …

ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्यामुळे पुणेकर आजोबांचा संताप; म्हणाले, मतदान करायचंय पण…

Lok Sabha Election 2024:  राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. बारामती मतदारसंघ गेल्या काही …