Video : दे धपाधप ! घुसखोरी करताना चिनी सैनिकांवर भारतीयांकडून लाठ्यांची बसरता, काय आहे सत्य?

India-China Soldier Viral Video : भारत आणि चीन सीमावाद (India and China Border) हा काय नवीन विषय नाही. चीन सैनिक अनेक वेळा भारतीय सीमेत घुसखोरी करतानाचा घटना समोर आल्या आहेत. चीन सैनिकांनी पुन्हा एकदा भारतीय सीमेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. ही घटना 9 डिसेंबरला तवांगमध्ये (Tawang) घडली. यावेळी भारत आणि चीनचे जवळपास 300हून अधिक सैनिक एकमेकांशी भिडले. या झटापटीमध्ये 30 सैनिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. या झटापटाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (India-China Soldier Viral Video) होतो आहे. 

दे धपाधप ! चीन सैनिकांवर लाठ्यांचा मारा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करत असताना भारतीय सैनिक त्यांचावर तुटून पडले. कोंबडी बकऱ्यांना काठ्यांनी जसं बदडून बदडून हकलतात तशी अवस्था या चीनी सैनिकांची झाली. भारतीय सैनिकांच्या लाठीच्या प्रसादामुळे चीनी सैनिकांच्या नाकीनऊ आणलं होतं. भारतीय सैनिकांचं रौद्ररुप पाहून सैनिक उलट्या पावले परत गेली. त्यानंतर भारतीय सैनिकांचा जल्लोष या व्हिडिओमध्ये दिसतं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातो आहे.  (India-China Soldier Viral Video Fact check indian soldiers beating chinese soldiers latest Trending Video )

व्हिडिओ मागील सत्य 

शिव आरूर आणि आदित्य राज कौल यांच्यासह अनेक पत्रकारांनी खुलासा केला की हे व्हिडिओ तवांगमधील भारत-चीन चकमकीचे आहेत. मात्र हा व्हिडिओ जुना आणि गलवान 2020 नंतरचा असू शकतो.हा व्हिडिओ कधीचा आहे हे स्पष्ट नसले तरी तो 9 डिसेंबरच्या घटनेचा नाही, असं सांगण्यात येतं आहे. 

आणखी एका ट्विटर वापरकर्ता मेजर अमित बन्सल (निवृत्त) आणि भू-रणनीती तज्ज्ञ यांनी म्हटलं आहे की, हा जुना व्हिडिओ आहे कारण अलीकडील चकमकी झालेल्या यांगत्झीच्या आसपासचा भागात बर्फाळ राहतो. 

दरम्यान तवांगमध्ये मार खावून चिनी माघारी गेले असले तरी एक मात्र नक्की. कुरापतखोर चीन शांत बसणार नाही. गलवान संघर्षानंतर सलग 30 महिने भारताला पूर्व लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करावं लागतंय. आता तशीच वेळ तवांगसारख्या अतिदुर्गम भागातही आली तर भारतासाठी ही मोठी डोकेदुखीच असेल. पण ड्रॅगनला कसं ठेचायचं हे भारताला चांगलंच ठाऊक आहे.

हेही वाचा :  Sri Lanka Food Crisis: श्रीलंकेत सोन्यापेक्षा दूध महागले! ब्रेडच्या पाकिटासाठी मोजावे लागतायेत 'इतके' रुपये | Sri Lanka Food Crisis: Milk more expensive than gold in Sri Lanka! You have to pay 'this much for bread packet



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …