ICE Water Facial चा त्वचेसाठी फायदा, वापरणे सोपे

त्वचा तजेलदार आणि चमकदार दिसण्यासाठी महिला अनेकदा फेशियल करून घेतात. पण पार्लरमधील हे फेशियल खर्चिक ठरते. तसंच यातील केमिकलयुक्त क्रिम्सचादेखील कधी कधी वाईट परिणाम होत असतो. त्वचेला नुकसानही पोहचते. तुम्हाला जर नैसर्गिकरित्या आपल्या चेहऱ्यावरील उजळपणा वाढवायचा असेल, चेहऱ्यावर तजेलदारपणा हवा असेल तर आईस वॉटर फेशियलचा तुम्हा आधार घ्यायला हवा. बर्फाच्या थंड पाण्याने तोंड धुणे असाच काहीसा हा प्रकार आहे. मात्र त्याची एक पद्धत आहे अन्यथा सर्दी आणि खोकल्याचा त्रास होण्याची शक्यता असते. घरच्या घरी आईस वॉटर फेशियलचा कसा वापर करायचा हे आम्ही ब्युटिशियन स्मिता कांबळे यांच्याकडून जाणून घेतली. या सोप्या पद्धतीने करा वापर.

आईस वॉटर फेशियल करण्याची पद्धत

आईस वॉटर फेशियल करण्याची नक्की पद्धत कशी आहे हे आपण आधी जाणून घेऊया आणि त्यानंतर त्वचेसाठी याचे कसे फायदे मिळतात याकडे लक्ष देऊ.

  • एका बाऊलमध्ये पाणी घेऊन ते फ्रीजमध्ये ठेवा आणि त्याचा बर्फ करून घ्या
  • बर्फ झाल्यावर फ्रिजमधून बाहेर काढा आणि मग एका मोठ्या पॅनमध्ये काढून घ्या
  • बर्फ वितळल्यावर जे पाणी येईल त्या पाण्यात तुमचा चेहरा बुडवा
  • काही सेंकदसाठी चेहरा तसाच राहू द्या आणि मग श्वास घेऊन त्वचा नॉर्मल होऊ द्या
  • असं ३-४ वेळा करा
  • त्यानंतर चेहरा टॉवेलने स्वच्छ करा आणि फरक पाहा
  • बर्फाचे तुकडे तुम्ही टॉवेलमध्ये घेऊनही त्वचेवर लाऊ शकता
हेही वाचा :  ​WhatsApp Tricks: व्हॉट्सॲप वापरायची मजा आणखी वाढणार, फक्त या ट्रिक्स करा फॉलो

आईस वॉटर फेशियल नक्की का करावे आणि याचे काय फायदे त्वचेसाठी होतात हे जाणून घ्या. आपली त्वचा चांगली राखण्यासाठी याचा वापर करून घेता येतो.

(वाचा – आलियासारखी त्वचा हवी असेल तर बाळंतणपणानंतर तजेलदार त्वचेसाठी घ्या विशेष काळजी)

आईस वॉटर फेशियल हे स्किन पोर्स ओपन करण्यासाठी उपयोगी

Ice Facial केल्यामुळे त्वचेचे पोर्स ओपन होतात. यामुळे त्वचेवरील चमक वाढण्यास मदत मिळते. पोर्स ओपन झाल्यामुळे त्वचेला श्वास घेणे सुलभ होते आणि त्वचेवरील जमा झालेली घाणही अत्यंत सहजरित्या निघून जाण्यास मदत मिळते.

(वाचा – केवळ पोटांच्या विकारावरच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर ठरतो ओवा, मुरूमांचाही त्रास जाईल)

चेहऱ्याची सूज कमी करण्यासाठी

अनेकदा झोप पूर्ण न झाल्याने अथवा सतत तणावात असल्यामुळे चेहऱ्यावर सूज येते अथवा डोळ्याखाली उठल्यानंतर पफीनेस जाणवतो. तुम्हालाही अशी समस्या असेल तर आईस वॉटर फेशियल तुम्ही वापरू शकता. सकाळी उठल्यानंतर तुम्ही हे फेशियल करावा. याचा नियमित उपयोग केल्यामुळे चेहरा आणि डोळ्यांजवळ येणारी सूज कमी होण्यास मदत मिळते आणि चेहराही टवटवीत दिसतो.

(वाचा – ५ गोष्टींची काळजी घ्याल तर स्ट्रेटनिंग केल्यानंतर होणार नाहीत केस फ्रिजी, सोप्या टिप्स)

हेही वाचा :  रंगाने त्वचेला हानी पोहण्याची भीती? होळीच्या आधी आणि नंतर त्वचेची काळजी घेण्यासाठी टिप्स

पिंपल्सची समस्या होईल कमी

तुम्हाला जर सतत पिंपल्सची समस्या असेल तर आईस फेशियल चेहऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतं. नियमित याचा उपयोग केल्यामुळे चेहऱ्यावरून पिंपल्स कमी होण्यास मदत मिळते. तुमच्याजवळ आईस फेशियल करण्याचा वेळ नसेल तर बर्फाचा तुकडा तुम्ही चेहऱ्यावर लावा आणि चेहऱ्यावर याचा परिणाम होतो.

टॅनिंग घालविण्यासाठी मदत मिळते

आईस फेशियल केल्याने चेहऱ्यावरील टॅनिंग निघून जाण्यास मदत मिळथे. तसंच चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात आणि त्वचेवर बर्फाच्या थंडपणामुळे त्वचा अधिक तजेलदार होण्यास मदत मिळते. याशिवाय चेहऱ्यावरील उजळपणा वाढण्यासाठी फायदा होतो.

आईस फेशियल हे कोणालाही करता येऊ शकते. पण आईस वॉटर फेशियल करताना जे पाणी तुम्ही वापरणार असाल तर स्वच्छ असावे याची काळजी घ्या. तसंच त्वचेवर कोणत्याही प्रकारची अलर्जी असल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बर्फ वापरा. सर्दी आणि खोकला असल्यास, याचा वापर करू नका.

(फोटो क्रेडिट : Freepik.com)

अधिक माहितीसाठी आमचा हा व्हिडिओ पाहा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान

Lokshabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी  आज (20 मे) मतदान होत …

‘उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाने माविआचा प्रयोग फसला’, शरद पवारांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar Statement : 2004 मध्ये राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद का नाकारलं? याबाबत शरद पवारांनी एका मुलाखतीत …