धक्कादायक! आजही इथे सख्खे भाऊ करतात एकाच मुलीशी लग्न; भावंड कितीही असो, नवरी मात्र एकच!

One Bride For All Brothers : आपण पौराणिक कथेंमध्ये एकाच मुलीसोबत घरातील 3-4 भावांच्या लग्न करण्याच्या अनेक गोष्टी वाचल्या आहेत. एका राजाच्या शेकडो राणी असतात आपण हे पुस्तकांमध्ये वाचलं आहे. त्यामागे काही प्रथा असतात. तुम्हाला माहितेय का आज ही अशा प्रथा प्रचलित आहेत. नुकतेच महाराष्ट्रात एकाच तरुणासोबत दोन जुळ्या बहिणींचे लग्न चव्हाट्यावर आले असताना, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता आणि आता या मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण एकाच मुलीचे अनेक नवरे करण्याची प्रथाही प्रचलित आहे. 

जगाचा एक भाग असा आहे जिथे ही प्रथा सामान्य आहे. आम्ही तिबेटबद्दल बोलत आहोत जिथे ही प्रथा अजूनही पाळली जाते. जिथे एका मुलीसोबत घरातील सगळे पुरुष लग्न करतात. (Shocking here brothers marry the same girl No matter how many siblings viral news marathi nz)

ही प्रथा अनेक शतकांपासून सुरू 

Melvyn C. Goldstein एक अमेरिकन समाजवादी आणि तिबेट विद्वान आहे. त्यांनी त्यांच्या लेखात लिहिले आहे की तिबेटमध्ये बंधुत्व बहुपत्नीत्व खूप सामान्य आहे जेथे दोन, तीन, चार भाऊ एकाच पत्नीसह एकत्र राहतात. सगळ्यांची मुलंही सोबत आहेत आणि कोण कोणाचा बाप आहे, हेही अनेकदा कळत नाही. जुन्या काळात हे खूप लोकप्रिय होते, परंतु आता ते क्वचितच पाहायला मिळते.

हेही वाचा :  पुढील 4 दिवसांमध्ये राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस

हे ही वाचा – Rinky Pinky Atul marriage : जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाशी केलेले लग्न कायदेशीर आहे का?

 

 

शेवटी, तिबेटमध्ये अशी प्रथा का निर्माण झाली?

चीनने तिबेट ताब्यात घेतल्यापासून, हा विवाह प्रकार कमी झाला आहे, परंतु ग्रामीण भागात अजूनही प्रचलित आहे. मेलव्हिनच्या लेखानुसार, 1950 पर्यंत तिबेटमध्ये बौद्ध भिक्खूंची संख्या 1 लाख 10 हजारांपेक्षा जास्त होती. यापैकी 35% विवाहयोग्य वयापेक्षा जास्त असलेले भिक्षू होते. बहुतेक कुटुंबांमध्ये, सर्वात लहान मुलाला भिक्षू बनण्यासाठी पाठवले गेले जेणेकरून लहान जमीन विभाजित होऊ नये. यानंतर हळूहळू जमिनीची विभागणी थांबवण्यासाठी एकाच कुटुंबातील इतर भावांशी महिलांची लग्ने लावण्याची प्रथा सुरू झाली. जमिनीचे विभाजन होऊ नये आणि करप्रणाली टाळता यावी म्हणून ही प्रथा चालू राहिली. तिबेटमध्ये 1959 ते 1960 या काळात चीनने या प्रथेवर कायदेशीर बंदी घातली होती, परंतु आजही ती येथे सुरू आहे.

 

सर्व मुलांना समान वागणूक 

त्या  कुटुंबातील सर्व मुलांना समान हक्क दिले जातात, जरी त्यांचे वडिल माहित नसले तरी त्यांची नाती मात्र घट्ट असतात. काही कुटुंबांमध्ये, फक्त मोठ्या मुलाला वडील म्हणून संबोधले जाते आणि इतर पुत्रांना नाही. कधीकधी मुलगा लग्नानंतर कुटुंब सोडू इच्छितो आणि त्याला जाण्याची परवानगी दिली जाते. त्याला मुले नसली तरीही. कुटुंबातील सर्व मुलांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही.

हेही वाचा :  Virla Video : स्वामी कसे बसतात? 6 महिन्याच्या चिमुकलीचा व्हिडीओ पाहून व्हाल फिदा!



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …