घटस्फोटीत महिलांनी सांगितले त्यांच्या आयुष्यातील थरारक अनुभव, या शुल्लक गोष्टीमुळे मोडले लग्न

Best Marriage Advice: लग्नानंतर सर्वांचे आयुष्य बदलून जाते. दुसऱ्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात जागा देणं हे खूप महत्त्वाचे असते. कारण हे नाते आयुष्यभर टिकवायचे असेल तर दोन व्यक्तींनी एकमेकांवर विश्वास ठेवणे गरजेचे असते. पण ही गोष्ट नात्यात नसेल तर त्याचे विपरित परिणाम दिसून येतात. जर जोडप्यांमधील संवाद चांगला असेल तर त्यांचे नाते केवळ चांगलेच राहणार नाही तर ते सर्व प्रकारचे प्रश्न एकत्र सोडवू शकतात. पण कधी-कधी वैवाहिक जीवनातील तणाव इतका वाढतो की पती-पत्नी एकमेकांशी बोलणेच थांबवतात आणि या गोष्टी घटस्फोटापर्यंत पोहचतात.अशात आपल्यातीलच काही महिलांनी त्याचे धक्कादायक अनुभव सांगितले आहेत. (फोटो सौजन्य :- टाईम्स ऑफ इंडिया)

​रागाच्या भरात बोलले शब्द

यावेळी एक महिलेने तिचे अनुभव शेअर करताना सांगितले की तुम्ही काय बोलताय या गोष्टीवर लक्ष द्या. रागात तुमचे शब्द खूप जपून वापरा. कारण तुम्ही विनोद करत आहात असे तुम्हाला वाटत असले तरीही समोरच्या व्यक्तीला काय वाटत असेल हे कळणं अशक्य आहे. भांडणाच्या वेळी बोलले जाणारे कडू शब्द अगदी उत्तम वैवाहिक जीवनही उद्ध्वस्त करू शकतात. (वाचा :- एकमेकांना गर्विष्ठ समजायचे, बरेच दिवस अजिबात बोलले नाही, चित्रपटापेक्षा कमी नाही बुमराह आणि संजनाची लव्ह स्टोरी)

हेही वाचा :  राज्यात 50 पेक्षा जास्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; लोकसभा निवडणुकीआधी सरकारचा मोठा निर्णय

​संवाद खूप महत्त्वाचा

कोणत्याही नात्यात संवाद खूप महत्त्वाचा असतो. जर तो नसेल तर वैवाहिक जीवनात अनेक अडथळे निर्माण होतात. नात्यात अनेक अडचणी येऊ शकतात. समस्या देखील अनेक वेळा वाढू शकतात. पण जोडप्यांमधील संवाद कधीही थांबू नये. (वाचा :- विक्रम गोखलेंचा ‘या’ बेस्टफ्रेंडने दिली त्यांना आयुष्यभर साथ, नात्यांना जपण्याची कला शिकण्यासारखी)

​नात्यात तिसऱ्या व्यक्तीला जागा नसावी

सुखी वैवाहिक जीवनासाठी तुमच्या जोडीदाराशिवाय इतर कोणासाठीही जागा नसावी. त्याचे म्हणणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणे गरजेचे आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला सोडून इतर कोणाला खास महत्त्व देत असाल तर या गोष्टीचा तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम होईल. अशा स्थितीत तुमच्या आयुष्यातील काही काळ तुमच्या जोडीदाराला देखील द्या. (वाचा :- रोज टोमणे, मार आयुष्य अगदी नरक झाले होते..या 4 महिलांनी सांगितल्या आयुष्यातील थरारक कहाण्या, तुम्हीही गहिवरून जाल)

​वेळ द्या

जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारापेक्षा कामाला प्राधान्य देता तेव्हा त्याचा परिणाम नात्यावर होतो. कामाच्या नादात तुम्ही तुमच्या जोडीदाराला विसरता. माझ्या बाबतीत ही असेच काहीसे झाले. कामाच्या नादात मी माझ्या जोडीदाराला विसरुन गेले आणि त्याचा थेट परिणाम आमच्या नात्यावर झाला. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला वेळा द्या. (वाचा :- नवर्‍याची फसवणूक करण्याआधी सत्य कळले असते तर माझी इतकी वाईट स्थिती झाली नसती)

हेही वाचा :  अरबाज आणि मलायकाच्या नात्यात या कारणाने आला दुरावा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …