खुशखबर! लग्नसराईत सोनं-चांदी स्वस्त, लगेच चेक करा आजचे दर

Today Gold Silver Price: आज कार्तिक अमावस्या असून सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास आज स.11:15 ते दु.12:21 या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. याचपार्श्वभूमीवर आज कार्तिक अमावस्या (Kartik Amavasya 2022) असल्याने सोने खरेदी करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.  तुम्ही जर सोनं खरेदीचा विचार करत असाल तर आताच 24 कॅरेट ते 18 कॅरेटचे दर तपासून घ्या. (gold silver price update 23 November 2022)

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोनं खरेदी (gold rate) करणं स्वस्त झालं आहे. दरम्यान आजही सोन्याच्या दरात घसरण दिसत आहे तर चांदीच्या दरात मात्र तेजी दिसून येत आहे. आज कार्तिक अमावस्या (Kartik Amavasya 2022) असल्याने सोने खरेदी करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. यामध्ये आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,340 तर 24 कॅरेट साठी 52,740 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 612 रुपये आहे. 

24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर

चेन्नई – 53,510 रुपये

हेही वाचा :  जेव्हा बाबा 15 दिवसांनी घरी येतात..; चिमुकलीचा हा Video पाहिला का?

दिल्ली – 52,900 रुपये

हैदराबाद – 52,740 रुपये

कोलकत्ता – 52,740 रुपये

लखनऊ – 52,900 रुपये

मुंबई – 52,740 रुपये

नागपूर – 52,740 रुपये

पुणे – 52,740 रुपये

सोन्याची शुद्धता अशी तपासा

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

वाचा: निराधार मुलांना आधार देणाऱ्या नगरीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा गळा दाबून घेतला जीव 

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात  

हेही वाचा :  Insurance Policy सरेंडर कशी करायची ? किती टक्के रक्कम हाती येईल ? जाणून घ्या सर्वकाही...

हॉलमार्क (Hallmark)

सोने खरेदी करताना सुरूवातीला त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …