आलिया भट्टला मुलीकरता आवडलं ‘हे’ नाव, तुम्हालाही वाचून होईल अतिशय आनंद

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरचा आनंद आता गगनात मावत नाही. या स्टार कपलला काहीच दिवसांपूर्वी म्हणजे ६ नोव्हेंबर रोजी गोड मुलगी झाली आहे. या गोंडस मुलीच्या नावावरून सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

इतर पालकांप्रमाणे आलिया आणि रणबीरने आपल्या मुलाचं नाव अगोदरपासूनच शोधायला सुरूवात केली होती. अद्याप या दोघांकडून बाळाच्या नामकरणाची कोणतीही ऑफिशअल माहिती आलेली नाही. पण सगळेचजण हे नाव जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

दरम्यान, आलियाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने एका नावाचा उल्लेख केला आहे. आलिया म्हणतेय की, ते खूप गोंडस नाव आहे. तेव्हापासून आलिया आपल्या मुलीचे नाव ‘हे’ ठेवू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. जर तुम्ही तुमच्या मुलीची नावे शोधत असाल किंवा आलियाच्या मुलीचे नाव जाणून घेऊ इच्छित असाल तर या लेखात तुम्हाला सर्व काही जाणून घेता येईल. (फोटो सौजन्य – Alia Bhatt इंस्टाग्राम / टाइम्स ऑफ इंडिया )

हेही वाचा :  'गंगूबाई काठियावाडी'वरून नवा वाद, मुलगा म्हणाला 'माझी आई समाजसेविका होती, पण चित्रपटात....'

काय आहे नाव

आलियाने एका शोमध्ये “अल्मा” हे नाव ऐकले होते आणि ‘अल्मा’ हे नाव खूप सुंदर असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून आलिया तिच्या मुलीचे नाव ‘अल्मा’ ठेवू शकते अशी चर्चा रंगली आहे. ‘अल्मा’ हे अरबी नाव आहे ज्याचा अर्थ पालनपोषण, दयाळू किंवा दयावान आणि पवित्र आत्मा असा आहे.

(वाचा – तुम्हालाही आई म्हणून क्रांती रेडकर सारखा अनुभय आलाय? मुलं, आजी-आजोबा आणि त्यांचा गोंधळ…))

​आलिया रणबीर नावाकरता या गोष्टीचा करतील विचार

आलिया रणबीर यांची मुलगी ज्या रूग्णालयात जन्माला आली तेथेच दिवंगत ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्यावरही उपचार सुरू होते. तसेच आलिया आणि रणबीर नाव ठेवताना ऋषी कपूर यांच्याशी काही तरी कनेक्शन जोडतील अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. मुलाच्या जीवनातील मोठा क्षण आहे, ज्यावेळी ऋषी कपूर नाहीत. त्यामुळे त्यांचे स्मरण करून लेकीचं नाव ठेवलं जाईल अशी चर्चा रंगली आहे.

(वाचा – ‘मुलीच्या जन्मापेक्षा जगात दुसरा कोणताच आनंद नाही’ अक्षयची भावूक पोस्ट, मुलीला बाबाकडून हव्या असतात या 6 गोष्टी)

​आश्वी

जर तुमच्या मुलीचे नाव ‘अ’ अक्षरावरून आले असेल तर तुम्ही तिचे नाव आश्वी ठेवू शकता. आश्वी नावाचा अर्थ “धन्य, दयाळू आणि विजयी” असा आहे. हे देवी सरस्वतीच्या अनेक नावांपैकी एक आहे.

हेही वाचा :  जगभरातील सोने संपणार? पृथ्वीवर आता फक्त इतके टक्केच उरलंय? जाणून घ्या

(वाचा – तुमची मुलंसुद्धा मोबाइलमध्ये बिझी असतात, मुलांना Gadget पासून लांब करायचंय? Sudha Murthy यांच्या फायदेशीर टिप्स)

​त्रिशिका

हे नाव तुमच्या मुलीसाठी खूप गोंडस असेल. त्रिशिका नावाचा अर्थ लक्ष्मी, त्रिशूल. जर तुम्हाला तुमच्या घरात मां लक्ष्मीचा वास असावा असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मुलीसाठी तिचे हे नाव निवडू शकता.

(वाचा – एबी डिविलियर्सच्या मुलाचं भारतीय नाव, प्रत्येकजण करतंय या नावाचं कौतुक?)

​रुत्वी

हे नाव तुमच्या मुलीसाठी देखील खूप सुंदर असेल. रुत्वी नावाचा अर्थ “परी, हवामान, प्रेम आणि संत किंवा दयाळू” असा आहे. हे खूप वेगळं नाव आहे. या अगोदर या नावाचा उच्चार ऐकलेला नसेल, तर हे नाव मुलीसाठी निवडू शकता.

(वाचा – वडील असूनही ते नसल्याचं भासवणं, त्यांच्याशी संपर्क न ठेवणं..श्रद्धा वालकर प्रकरणावरून पालकांनी काय शिकावं?))

​माहिरा

जर तुमच्या मुलीचे नाव ‘म’ अक्षरावरून आले असेल तर तुम्ही माहिरा हे नाव निवडू शकता. माहिरा नावाचा अर्थ अत्यंत कुशल, तज्ञ, जलद, प्रतिभावान, शक्तिशाली, एक ज्ञानी, तज्ञ व्यक्ती असा आहे. अगदी नावाच्या अर्थाप्रमाणे सगळे गुण मुलीमध्ये उतरतील.

हेही वाचा :  RRR : 'आरआरआर' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर 10 दिवसांसाठी तिकीट महागणार

(वाचा – Madhuri Dixit ची पॅरेंटिंग स्टाइल सगळ्यात हटके, परदेशात राहूनही म्युझिक ते अगदी कुकिंगमध्ये एक्सपर्ट आहेत मुलं))

​मिशिका

तुम्ही तुमच्या मुलीसाठी हे ‘मिशिका’ नाव देखील निवडू शकता. मिशिका नावाचा अर्थ “देवावरचे प्रेम; साखरेचा गोडवा असलेली व्यक्ती”. मुलीसाठी अतिशय परफेक्ट नाव आहे. मुलगी देखील या नावाप्रमाणेच होईल.

(वाचा – रतन टाटा यांनी विद्यार्थी आणि पालकांना दिल्या यशाच्या १० Golden Advice))

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Porshce Accident: पुरावे मिटवण्याच्या कटात आईचाही हात? पोलिसांनी केला फोन पण शिवानी अग्रवाल…

Pune Porsche Accident Minor Driver Mother: पुण्यातील पोर्शे अघात प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे होत असतानाच आता …

Pune Porsche Accident: तावरेने ससूनमधून अल्पवयीन मुलाऐवजी कोणाचं रक्त तपासणीला पाठवलं? समोर आली माहिती

Who’s Blood Was Sent By Taware From Sassoon Hospital: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या …