काँग्रेस, NCP च्या नेत्यांची सुरक्षा काढली आणि आपल्या सहा मंत्र्यांची सुरक्षा वाढवली; शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा चर्चेत

सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : शिंदे फडवीस सरकारने(Shinde-Fadnavis Government) नुकतीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुरक्षा(Safety of leaders) काढली. यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारने आपल्या सहा मंत्र्यांची सुरक्षा वाढवली आहे. या निर्णयामुळे शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा चर्चेत आले आहे. शिंदे-फडणवीस सरकारने स्वतःच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना वाय प्लस कॅटेगिरी ची सुविधा पुरवली आहे(Maharashtra Politics). 

शिंदे-फडणवीस सरकारने स्वतःच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या सुरक्षेबाबात घेतलेल्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. सहा मंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या सहा मंत्र्यांना आता वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. 

सहा मंत्र्यांना वाय प्लस विथ एस्कॉर्ट सुरक्षा पुरवण्याचे गृह विभागाचे आदेश 

आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश खाडे, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, सहकार मंत्री अतुल सावे आणि महिला बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा या सहा मंत्र्यांच्या सुरक्षेत सरकारने वाढ केली आहे. या मंत्र्यांना वाय प्लस विथ एस्कॉर्ट सुरक्षा पुरवण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत.

हेही वाचा :  'जिंकलेल्या जागेवर बोलायचं नाही', संजय राऊतांनी काँग्रेसला स्पष्ट सांगितलं, 23 जागा लढण्यावर ठाम

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या डझनभर नेत्यांची सुरक्षा काढली

आठवडाभरापूर्वी शिदे फडणवीस सरकारने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या डझनभर नेत्यांची सुरक्षा काढली. यामध्ये जयंत पाटील, वरुण सरदेसाई, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, नाना पटोले, जयंत पाटील, सतेज पाटील, संजय राऊत, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, भास्कर जाधव, नवाब मलिक, नगरहरी झिरवळे, सुनील केदारे आदी नेत्यांचा समावेश आहे.  

जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा जैसे थे तर मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुरक्षा काढली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा जैसे थे ठेवली होती. तर, शिवसेना शिंदे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना झटका

सुरक्षा काढून घेत शिंदे फडणवीस सरकारनं महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा झटका दिला आहे. त्यातच आता स्वत: मंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. यामुळे सुरक्षेच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण पुन्हा तापणार आहे.  

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Kejriwal Bail Hearing: 100 चे 1100 कोटी कसे झाले? सुप्रीम कोर्टाची ED ला विचारणा, ‘मिस्टर राजू तुम्ही…’

Arvind Kejriwal Bail Hearing: दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind …

VIRAL VIDEO : चंदन टीका लावणाऱ्याची कमाई ऐकून नेटकरी शॉक, म्हणतो- ‘डॉक्टर से कम समझे क्या!’

Viral Video : देशातील कुठल्याही मंदिरात जा तिथे तुम्हाला आजी आजोबासह अनेक चिमुकले पोरं चंदन …