Breaking News

तरुण-तरुणींना लग्न का करायचं नाही? गौर गोपाल दास यांनी सांगितली कारणं

येत्या काही वर्षातच संपूर्ण एक पिढी (generation) अशी असणार आहे जी फक्त स्वतः बाबतच विचार करणारी आहे अशी चर्चा सातत्याने ऐकायला मिळते. स्वार्थ, अविश्वास (mistrust), असंवेदनशील मन आणि फक्त तंत्रज्ञानाची (technology) साथ अशी काहीशी अवस्था या पिढीची असणार असल्याचे म्हटले जाते. सध्या लिव्ह इन रिलेशनशिपलाही (live in relationship) अनेकांकडून पसंती मिळत आहे. अशातच पुढच्या पिढीतील तरुण – तरुणी हे लग्न (marriage) करणार की नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतोय. प्रशिक्षक, संत, लेखक, जीवनशैली रणनीतीकार असणाऱ्या गौर गोपाल दास (gaur gopal das) यांनी याबाबत भाष्य केले आहे. (Why young people do not want to get married Reasons given by Gaur Gopal Das)

इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात बोलताना गौर गोपाल दास (gaur gopal das) यांनी जीवन (life) कसे जगावे याबद्दल आपले मत मांडले आहे. “आयुष्यातील दोन दिवस तुमच्यासाठी खूप महत्वाचे असतात. पहिला दिवस ज्या दिवशी तुमचा जन्म झाला आणि दुसरा म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला कळेल की तुमचा जन्म का झाला आहे. आपल्या जगण्याचा उद्देश काय आहे हे जेव्हा आपण जाणून घेतो तेव्हा आपल्याला कळते की आपण फक्त कर (Tax) भरण्यासाठी, आपल्या कामात यशस्वी होण्यासाठी जन्माला (Birth) आलेलो नाही. आपण ज्यासाठी जन्मलो ते यापेक्षाही खूप काही जास्त आहे,” असे स्वामी गौर गोपाल दास (gaur gopal das) म्हणाले.

हेही वाचा :  Apple ची सिक्युरिटी सिस्टीम क्रॅक करणं मुश्किल ही नहीं नामुमकीन... Hacker लावतील डोक्याला हात

ज्या कामात सर्वोत्कृष्ट असाल त्याच कामासाठी पैसे घ्या

“आपल्यापैकी अनेकांना डेडलाइन, ऑफिसचं राजकारण, कामाचा दबाव आणि तणाव असतो. आपल्याला जे आवडत नाही आणि ज्यासाठी आपण उत्साहित नाही तेच आपण करत आहोत. जे मिळतंय त्यात आपण समाधानी नाही. जर आठवड्यातून 5 दिवस दिवसातून 8 तास काम करता, तर तुम्ही ज्यांच्यासाठी काम करता त्यांना तुम्ही 50 आठवडे देता, म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये वर्षातून सुमारे 2000 तास देता. तुम्ही तुमच्या आयुष्यातील 10 वर्षे त्या कामासाठी देता ​​ज्यात तुम्हाला समाधान नाही. मी लोकांना सांगतो, ज्या कामात तुम्ही सर्वोत्कृष्ट असाल त्याच कामासाठी पैसे घ्या आणि ते त्याच वेळी करा जेव्हा तुम्हाला आनंद मिळेल. म्हणून तुम्ही जे करता त्यावर प्रेम करा आणि तुम्हाला जे आवडते ते करा!,” असे गौर गोपाल दास यांनी म्हटले.

6 महिने एकत्र राहून एकमेकांना समजून घेऊ शकत नाही

“आजकाल लग्नाचा अर्थ बदलला आहे. आजच्या तरुणांना लग्न करायचे नाही. कारण त्यांना वैवाहिक जीवनात अपयश येत आहे. जर त्यांनी लग्नाला अयशस्वी संस्था म्हणून पाहिले तर ते लग्न का करतील? बरेच लोक रिलेशनशिपमध्ये आहेत, वैवाहिक जीवन जगत आहेत आणि प्रत्येकाला माहित आहे की कोणीही परिपूर्ण नाही. त्यामुळे लग्नात जर आपण खूप अपेक्षा ठेवल्या तर प्रत्येक लग्न फसल्यासारखे दिसेल. तुम्ही लिव्ह इनमध्ये असाल किंवा लग्न केले असेल तर प्रत्येक नात्यात बांधिलकीची गरज असते. म्हणजेच प्रत्येकाच्या चढ-उतारात साथ देणे, एकत्र राहणे. नातेसंबंध टिकवण्यासाठी गुंतवणूक करावी लागते. 6 महिने एकत्र राहून तुम्ही एकमेकांना समजून घेऊ शकत नाही,” असेही मत गौर गोपाल दास यांनी व्यक्त केले.

हेही वाचा :  सासूच्या पार्थिवाला सुनांनी दिला खांदा पूर्ण केली तिची शेवटची इच्छा, हृदयस्पर्शी कहाणी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘…तर हेतू साध्य होणार नाही,’ सुप्रीम कोर्टाचा अल्पवयीन मुलाला जामीन देण्यास नकार; पुणे अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्णय चर्चेत

पुण्यात बेदरकारपणे कार चालवत दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या अल्पवयीन चालकाला कोर्टाने जामीन दिल्यानंतर नाराजी व्यक्त …

प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबई-पुणे दरम्यान 28 मे ते 2 जूनपर्यंत अनेक ट्रेन रद्द होणार, वाचा संपूर्ण लिस्ट

Mumbai-Pune Train cancelled List: मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 28 …