Lunar Eclipse 2022 : चंद्रग्रहणाचा गर्भवती महिलांवर काय परिणाम होतो? काय करावं, काय टाळावं? डॉक्टरांचा सल्ला

८ नोव्हेंबर २०२२ रोजी या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण कार्तिका पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे मंगळवारी दिसणार आहे. भारताच्या काही भागांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे. जाणून घेऊया या चंद्रग्रहणाचा गरोदर महिलांवर काय परिणाम होतो.

चंद्रग्रहणाचा कालावधी काय? गर्भवती महिलांनी या दिवशी स्वतःची कशी काळजी घ्यावी? ग्रहण काळात महिलांनी काय करावे आणि काय टाळावे? हे पाहणार आहोत. तसेच चंद्रग्रहणाचा गर्भवती महिलेवर काय परिणाम होतो? हे नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ डॉ. अनु विज यांनी सांगितलं आहे. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​गरोदर महिलांनी काय करू नये

  • असे म्हटले जाते की गरोदर महिलांना ग्रहण काळात घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातो.
  • गरोदर महिलांना सल्ला दिला जातो की, त्यांनी कोणतेही कापड कापू नये किंवा शिवू नये किंवा इतर तत्सम क्रिया करू नये कारण या क्रियांचा बाळावर समान परिणाम होतो.
  • ग्रहणकाळात तेल मसाज, पिण्याचे पाणी, मल-मूत्र विसर्जन, केस आंघोळ करणे, दात घासणे आणि लैंगिक क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्यास मनाई आहे.
हेही वाचा :  गरोदरपणात होणाऱ्या मळमळ आणि उलट्यांसाठी घरगुती उपाय

(वाचा – मुलीचं नाव ठरवायला ऐश्वर्या आणि अभिषेकने लावले इतके दिवस, बच्चन कुटुंबियांपासूनही का लपवलं नाव?))

घराबाहेर न पडण्याचा सल्ला

चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी खोलीत किंवा घरात थांबावे कारण असे मानले जाते की चंद्रग्रहणाचा गर्भावर वाईट परिणाम होतो. असे म्हटले जाते की ग्रहणाच्या प्रभावामुळे मुलांमध्ये शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व येऊ शकते. गरोदर महिलांना ग्रहण काळात घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातो.

(वाचा – आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलांवर होऊ नये म्हणून Nita Ambani यांनी पाळल्या ‘या’ गोष्टी, मुलांवर करा असे संस्कार))

​काहीही कापू नये

चंद्रग्रहण काळात गरोदर महिलांनी चाकू, कात्री, सुऱ्या यांसारख्या कोणत्याही धारदार गोष्टींचा वापर करण्यास विसरू नये. असे मानले जाते की या गोष्टी वापरून न जन्मलेल्या बाळाला हानी पोहोचते.

(वाच -Aai Kuthe Kai Karte फेम रूपाली भोसलेने शेअर केला बाळाचा फोटो, बाळ घरी येणार असल्यासं कसं हवं घरातलं वातावरण?))

​काहीही खाऊ नये

चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी कोणतेही पदार्थ खाऊ नयेत. असे मानले जाते की चंद्रग्रहणातून बाहेर पडणारे किरण अन्न दूषित करतात. यामुळे अन्न पदार्थ न खाता नारळ पाणी पिण्याचा सल्ला या काळात दिला जातो.

हेही वाचा :  Pune: ज्याने 75 लाखांची सुपारी दिली तो आरोपी बाप निघाला! प्रॉपर्टीसाठी मुलाच्या जीवावर उठला

(वाचा – चर्चा तर होणार! एकाचवेळी गायिकेनं केलं जुळ्या मुलांना स्तनपान, Bollywood Mom ने सांगितलं Breast Feeding चं महत्व))

​महिलांनी झोपू नये

ग्रहण काळात गर्भवती महिलांनी झोपू नये. कारण याकाळात दूषित गोष्टी बाहेर पडतात. झोपेत गर्भवती महिलेला किंवा बाळाला काही त्रास झाला तर तो कळणार नाही. त्यामुळे चंद्रग्रहणात महिलांना न झोपण्याचा सल्ला दिला जातो.

(वाचा – मुलांनी उत्तम यश संपादन करावं असं वाटतंय? सद्गुरू वामनराव पै यांनी सांगितलेल्या उत्कर्षाच्या 7 पायऱ्या फॉलो करा)

​सकारात्मक विचार करावा

ज्योतिषशास्त्रानुसार गरोदर महिलांनी ग्रहणाच्या वेळी तोंडात तुळशीची डाळ ठेवून हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तुतीचा पाठ करावा. याचा नकारात्मक शक्तींवर परिणाम होत नाही. गरोदर महिलांनी ग्रहणकाळात त्यांच्या प्रमुख देवतेचा मंत्र जप करावा. यामुळे गर्भातील बाळ निरोगी आणि सुरक्षित राहते.

(वाचा – घटस्फोटाचा निर्णय मागे घेणाऱ्या धनुषच्या मुलांची नावे माहित आहेत? आतापर्यंत अशी नावे कुठेच ऐकली नसतील)

​डॉक्टरांची प्रतिक्रिया

चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. ज्यात चंद्र आणि सूर्याच्या मध्ये पृथ्वी येते आणि सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडत नाही. शास्त्रामध्ये चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाला महत्त्व असून गर्भवती महिलांनी काय करायला हवे किंवा करू नये याच्या सूचना दिलेल्या आहेत. पाहता याला कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. गरोदर स्त्रियांनी चंद्रग्रहणाच्या वेळेस अजिबात झोपू नये असे म्हटले जाते मात्र या गोष्टीला देखील कोणताही वैज्ञानिक आधार नसून हा एक गैरसमज आहे.

हेही वाचा :  मुंबई असुरक्षित होतेय? 24 वर्षीय तरुणीसोबत अश्लील चाळे, आरोपीने धावत्या लोकलमधून मारली उडी

ग्रहणादरम्यान पृथ्वीवरील वातावरणात काही प्रमाणात फरक पडतो. पण त्याचा अर्थ काही खाऊ पिऊ नये, असा होत नाही. तसे केल्यास गर्भवती महिलेच्या रक्तातली साखर कमी होऊन चक्कर येते, थकवा येतो. गर्भाच्या रक्तातली साखर ही थेट आईच्या शुगरलेव्हलवर अवलंबून असते. बाळाचा जन्म आणि ग्रहण याचा शास्त्रीय काहीही संबंध येत नाही.

(वाचा – सतत लघवीला येणं, स्तनांना सूज हे Early Pregnancy Symptoms, मासिक पाळी येण्याआधीच मिळेल Good News)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …