Multibagger Stock: हे स्टॉक म्हणजे कुबेराचं धन! गुंतवणूकीवर तुफान परताव्याची शक्यता

मुंबई :Stock to Buy : तुम्हालाही शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर आता तुमच्यासाठी चांगली संधी आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात जागतिक बाजारात मोठी घसरण झाली होती. भारतीय शेअर बाजारातही सातत्याने घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे काही स्टॉक्समध्ये गुंतवणूकीची चांगली संधी निर्माण झाली आहे. हे स्टॉक्स काही काळानंतर चांगले रिटर्न्स देऊ शकतात. ब्रोकरेज हाऊस एंजेल वन सध्या Stove Kraft, Ashok Leyland, Federal Bank च्या स्टॉकवर खरेदी सल्ला देत आहे. या स्टॉक्समध्ये गुंतवणूकीसाठी लक्ष्य आणि परताव्याबाबत अधिक तपशील जाणून घ्या…

1. फेडरल बँकेचा शेअर्स

सध्याची किंमत- 97.15
लक्ष्य किंमत- 135
परतावा – 39%

ब्रोकरेज हाऊस एंजेल वनने म्हटले आहे. की फेडरल बँक भारतातील सर्वात जुन्या खाजगी बँकांपैकी एक आहे. बँकेचा NPA गेल्या काही वर्षांपासून स्थिर राहिला आहे, Q3FY21 साठी GNPA 3.38% होता तर NNPA प्रमाण 1.14% होता. तसेच Q3FY21 च्या शेवटी पुरेसा पीसीआर 67% होता. म्हणून या स्टॉकमध्ये गुंतवणूकीचा सल्ला देण्यात आला आहे. 

हेही वाचा :  Share Market : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, यांना 'हे' काम 24 तासांत लागेल करावे

2. Stove Kraft

सध्याची किंमत – 616
लक्ष्य किंमत- 1,050
परतावा – 70.45%

ब्रोकरेज हाऊसने या स्टॉकच्या खरेदीचा सल्ला दिला आहे. स्टोव्ह क्राफ्ट लिमिटेड (SKL) ‘Pigeon’ आणि ‘Gilma’ या ब्रँडचे प्रेशर कुकर, LPG स्टोव्ह, नॉन-स्टिक कुकवेअर इत्यादी किचन आणि घरगुती उपकरणे उत्पादन आणि विक्रीचा व्यवसाय करते. गेल्या दोन वर्षांत, कंपनीने प्रेशर कुकर आणि कुकवेअर उत्पादन क्षेत्रात आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आहे. SKL येत्या काही दिवसांत नवीन उत्पादने बाजारात आणणार आहे, ज्याचा गुंतवणूकदारांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

3.  Ashok Leyland चे शेअर्स

सध्याची किंमत – 115
लक्ष्य किंमत- 164
परतावा- 42.61%

अशोक लेलँड लिमिटेड (ALL) ही medium & heavy commercial vehicle (MHCV) विभागातील 32% मार्केट शेअरसह भारतीय CV उद्योगातील आघाडीची कंपनी आहे.

कोरोना महामारीनंतर Light Commercial Vehicles सेगमेंटची मागणी झपाट्याने वाढत आहे. तर दुसऱ्या लॉकडाऊननंतर MHCV सेगमेंटची मागणीही बाजारात वाढू लागली आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …