LSG vs CSK : आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात चेन्नई सुपरकिंग्स आणि लखनौ सुपरजायंट्स (CSK vs LSG) या दोन्ही संघाची पराभवाने झाली आहे. चेन्नईला कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) तर लखनौला गुजरात टायटन्सने (GT) मात दिली आहे. ज्यानंतर आता दोघेही आपल्या पहिल्या विजयासाठी आज मैदानात उतरतील.

आयपीएलमध्ये आज लढणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स आणि लखनौ सुपरजायंट्स या दोन्ही संघाचा विचार करता दोघांकडे तगड्या खेळाडूंचा भरणा आहे. पण पहिल्या सामन्यात दोन्ही संघाचे काही खेळाडू अनुपस्थित असल्याने त्यांना खास कामगिरी करत आली नसवी, दरम्यान चेन्नई आज त्यांचा हुकूमी एक्का मोईन अलीला (Moeel Ali) नक्कीच संघात सामिल करु शकतात.

कधी आहे सामना?

आज 31 मार्च रोजी होणारा हा चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.

कुठे आहे सामना?

हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

कुठे पाहता येणार सामना?

चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.

हे देखील वाचा-

RCB Vs KKR: रोमांचक सामन्यात आरसीबीचा विजय; वानिंदु हसरंगा, आकाश दीपची चमकदार कामगिरी

IPL 2022, SRH vs RR: राजस्थानचा हल्लाबोल! संजूची विस्फोटक फलंदाजी, चहलचा भेदक मारा, हैदराबादचा 61 धावांनी पराभव

IPL 2022, GT vs LSG : गुजरातची विजयी सलामी, लखनौचा पाच गड्यांनी पराभव

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha