“देशात ‘2 चाईल्ड पॉलिसी’ आणा नाहीतर कश्मिर फाईल्स सारख्या फाईल्स तयार होतील” : तोगडिया

मुंबई : कश्मिर फाईल्स ‘हा’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने कश्मिर पंडितांवरील अन्यायाला सर्वांसमोर आणलं आहे. या सगळ्यात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेचा विषय ठरले. त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान कश्मिर फाईल्स नाही तर संपूर्ण देशाची फाईल्स काढावी लागण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी यासोबतच दोन अपत्य धोरण (Two children policy) लागू करण्याबाबत देखील वक्तव्य केलं.

प्रवीण तोगडिया यांनी सोमवारी एका कार्यक्रमात सांगितले की, काश्मिरी पंडितांच्या बाबतीत जे घडले त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी देशभरात “दोन मुले” धोरण लागू केले जाईल.

हे धोरण का आवश्यक आहे या मागचे कारण सांगत तोगडिया म्हणाले, “आता दोन अपत्य धोरण लागू करण्याची वेळ आली आहे. जर ते हे करू शकले नाहीत, तर 30 वर्षांनंतर संपूर्ण देशासाठी फायली तयार करण्याची वेळ येईल.. भरूच फाइल्स, वडोदरा फाइल्स, भारत फाइल्स, इत्यादी”

‘भाजप काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करू शकत नाही’

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष तोगडिया यांनीही दावा केला की, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ते काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करू शकले नाहीत, हे देखील खरं.

हेही वाचा :  Shraddha Murder Case: श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबला पश्चाताप की भीती? म्हणून त्याने...

भरुच येथे एका कार्यक्रमात तोगडिया यांनी मीडियाला सांगितले की, “काश्मिरमध्ये सुमारे चार लाख हिंदूंवर हल्ले करून त्यांना घराबाहेर पाठवण्यात आले, परंतु हे इतिहासातील अर्ध सत्य आहे.”

यात आणखी एक सत्य आहे. ते म्हणजे काश्मीरमध्ये पंडितांसोबत जेव्हा ही काही हिंसा सुरु आहे, ती गेल्या 30 वर्षांपासून आहे. ज्यापैकी 15 वर्षे काँग्रेसचे सरकार होते. तर उरलेली वर्ष भारतीय जनता पक्षाचे सरकार होते. प्रथम अटलबिहारी वाजपेयी आणि नंतर नरेंद्र मोदी. मग त्यांच्यापैकी कोणीही हिंदूंचे काश्मीरमधील त्यांच्या घरी यशस्वी पुनर्वसन का केले नाही? असा सवाल प्रवीणतोगडिया यांनी कार्यक्रमात उपस्थीत केला आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घरभर 500 च्या नोटांचे ढीग! ED ला नोकराच्या घरात सापडले 25 कोटी? ‘या’ मंत्र्याशी कनेक्शन

Jharkhand ED Raid: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये आचारसंहिता लागू असतानाच झारखंडमध्ये सक्तवसुली संचलनालयाने मोठी कारवाई केली …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …