Guru Grah Uday 23 March 2022 Positive Impact | Guru Uday: २३ मार्चपासून ‘या’ तीन राशींवर असेल गुरू बृहस्पतींची कृपा, जाणून घ्या


ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा ग्रह राशी बदलतो किंवा उदय-अस्त होतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. देवतांचे ज्ञान देणारे गुरु बृहस्पतीचा २३ मार्च रोजी उदय होणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा ग्रह राशी बदलतो किंवा उदय-अस्त होतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. देवतांचे ज्ञान देणारे गुरु बृहस्पतीचा २३ मार्च रोजी उदय होणार आहे. गुरूच्या उदयाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. तीन राशींना हा काळ फायदेशीर ठरू शकतो. चला जाणून घेऊयात तीन राशी कोणत्या आहेत.

मेष: या राशीच्या लोकांसाठी २३ मार्चपासून चांगला काळ सुरू होणार आहे. कारण ११ व्या भावात गुरुचा उदय होत आहे. या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचे स्थान म्हणतात. यावेळी तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. प्रतिष्ठा वाढू शकते. तसेच जागा बदलण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन करार निश्चित केला जाऊ शकतो, जो भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

वृषभ: गुरूचा उदय तुमच्यासाठी शुभ असू शकतो. कारण तुमच्या कुंडलीत दशम भावात गुरुचा उदय होईल. या स्थानाला नोकरी आणि करिअरचं स्थान म्हणतात. तुमच्या व्यवसायात चांगली वाढ होऊ शकते. तसेच नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. राजकारणात चांगले यश मिळू शकते. ज्यांची वेतनवाढ थांबली होती त्यांना वेतनवाढ मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरु करण्यास अनुकूल काळ आहे. या काळात तुमची कार्यशैली देखील सुधारेल. यामुळे तुमचं कामाच्या ठिकाणी कौतुक होईल.

हेही वाचा :  तुमचंही नाव मनोज असेल तर महाराष्ट्रातील 'या' हॉटेलमध्ये मिळेल खास ऑफर

मायावी ग्रह राहु करणार मेष राशीत प्रवेश, ‘या’ राशींना मिळणार जबरदस्त आर्थिक लाभ

सिंह: गुरूचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण बृहस्पतींचा सातव्या भावात उदय होत आहे. वैवाहिक जीवन आणि भागीदारीचे स्थान आहे. या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. भागीदारीच्या कामात यश मिळेल. तसेच जे लोक अविवाहित आहेत त्यांना या काळात लग्नासाठी विचारणा होईल.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर …

जशास तसा न्याय! बलात्काराच्या खोट्या आरोपात त्याने जे भोगलं तिच शिक्षा कोर्टाने तरुणीला सुनावली

Woman Jail For false Testimony In Rape Case: उत्तर प्रदेशमधील बरेली येथील कोर्टाने शनिवारी एका प्रकरणात …