होळीसाठी शहरात चोख पोलीस बंदोबस्त; केंद्रीय शांतता समितीच्या बैठकीत तक्रारींचा पाढा


नागपूर : सण-उत्सवादरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी चोख बंदोबस्त तैनात केला जाणार असून अनेकांची धरपकड सुरू आहे. कुणीही कायदा हातात घेण्याच्या प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. ते वनामतीच्या सभागृहात आयोजित केंद्रीय शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते. होळी, धुळवड आणि शब-ए-बारात हे उत्सव एकोप्याने साजरे व्हावे, यासाठी पोलीस आयुक्तांनी केंद्रीय शांतता समितीची बैठक आयोजित केली. या बैठकीत शहरातील शेकडो समिती सदस्यांनी पोलीस आयुक्तांसमोर समस्या आणि तक्रारींचा पाढा वाचला.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या नेतृत्वात पोलीस सहआयुक्त अश्वती दोरजे यांनी बंदोबस्ताची चोख आणखी केली आहे. होळीच्या दिवशी सकाळपासूनच शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाईल.  महिला व तरुणींची छेड काढणाऱ्यांना कोठडीत डांबण्यासाठी दामिनी पथक तैनात करण्यात आले आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणी स्थानिक पोलीसांना गस्त घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

फुगे फेकणाऱ्यांवर गुन्हे

होळी-धुळवडीदरम्यान रंगाचे फुगे फेकून मारणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करून कोठडीत डांबण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले. दीडशे गुन्हेगारांची धरपकड

हेही वाचा :  'या' जिल्हा बँकेच्या जुलमी वसुली कारभाराचा धक्कादायक गौप्यस्फोट, 'शेतकऱ्यांवर जप्ती, नेत्यांना मुक्ती'

गेल्या दहा वर्षांत होळी व धुळवडीत गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली असून त्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. होळी संपेपर्यंत त्यांना कारागृहात डांबले जाईल, अशी माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली.

पोलिसांनो, वागणूक सुधारा

अनेकांनी पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भाषा आणि वागणुकीबाबत तक्रारी केल्या. वाहन पकडल्यानंतर पोलीस खूप खालच्या दर्जाची भाषा वापरतात. तसेच अनेक पोलीस ठाण्यात अधिकारी आणि कर्मचारी गुन्हेगारांना सोबत घेऊन चहापाणी घेतात. त्यावर पोलीस आयुक्तांनी पोलिसांचे वर्तन सुधारण्यासंदर्भात उपायुक्तांना सूचना केली.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर …

जशास तसा न्याय! बलात्काराच्या खोट्या आरोपात त्याने जे भोगलं तिच शिक्षा कोर्टाने तरुणीला सुनावली

Woman Jail For false Testimony In Rape Case: उत्तर प्रदेशमधील बरेली येथील कोर्टाने शनिवारी एका प्रकरणात …