bmc to conduct sixth sero survey in mumbai zws 70 | मुंबईत सहावे सेरो सर्वेक्षण


आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या २०२१ च्या सुरुवातीलाच लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या होत्या.

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई :  करोनाच्या वर्धक मात्रेनंतर आरोग्य आणि अत्यावश्यक कर्मचाऱ्यांमध्ये किती प्रमाणात प्रतिपिंडे तयार झाली आणि ही प्रतिपिंडे किती काळ टिकणार याचा आढावा घेण्यासाठी पालिका सहावे सेरो सर्वेक्षण करणार आहे. हे सर्वेक्षण जवळपास नऊ महिने चालणार असून प्रथमच एवढय़ा मोठय़ा कालावधीचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या २०२१ च्या सुरुवातीलाच लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या होत्या. करोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दिले जात होते. त्यावेळी या कर्मचाऱ्यांच्या दोन्ही मात्रा पूर्ण होऊन सहा  महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेल्यामुळे प्रतिपिडांची संख्या कमी झाल्याने वर्धक मात्रा देण्याची मागणी मोठय़ा प्रमाणात केली जात होती. परंतु वर्धक मात्रेबाबत कोणताही अभ्यास नसल्यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाने याबाबत ठोस निर्णय देण्यास नकार दिला. अखेर तिसरी लाट सुरू झाल्यानंतर १ जानेवारीपासून वर्धक मात्रा देण्यास सुरुवात करण्यात आली.  करोनाचा प्रादुर्भाव सध्या कमी झाला असला तरी पुढील लाट येण्याचे संकेत दिले जात आहेत. तेव्हा पुढील लाट येण्याच्या काळात आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्धक मात्रेमुळे पुरेसे सक्षम आहेत का किंवा त्यांना पुन्हा वर्धक मात्रा देण्याची गरज भासू शकते याचा अभ्यास पालिका करणार आहे. यासाठी सहावे सेरो सर्वेक्षण पालिका करणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. वर्धक मात्रेच्या या अभ्यासातून हाती आलेले निष्कर्ष महत्त्वाचे असून केंद्रीय आरोग्य विभागाकडेही हा अभ्यास सादर केला जाईल. पुढील वर्धक मात्रेच्या निर्णयासाठी हा अभ्यास फायदेशीर असेल, असेही काकाणी यांनी सांगितले.

हेही वाचा :  ED, CBI कडून जप्त होणाऱ्या करोडो रुपयांचं नेमकं काय होतं? अशी आहे प्रक्रिया...

वर्धक मात्रा घेतलेले – ३५८३८

आरोग्य कर्मचारी – ५५४१६

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी

सर्वेक्षणाची प्रक्रिया

* तीन टप्प्यांत सर्वेक्षण करणार

* तीन हजार आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे नमुने घेऊन प्रतििपडे तपासणार.

* सहा महिन्यांनंतर याच कर्मचाऱ्यांतील प्रतििपडांची तपासणी.

* वर्धक मात्रा घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश.

* तिसऱ्या लाटेत बाधित झालेल्या, वर्धक मात्रा न घेतलेल्यांना वगळणार. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …