mumbai special court denies bail to anil deshmukh in money laundering case zws 70 | अनिल देशमुख यांना जामीन नाहीच


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

मुंबई : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन देण्यास विशेष न्यायालयाने सोमवारी नकार दिला. आदेशाची तपशीलवार प्रत उशिरापर्यंत उपलब्ध झाली नाही.

सकृद्दर्शनी आर्थिक गैरव्यवहाराचे ठोस पुरावे आहेत आणि आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील काही कलमांनुसार जामीन देण्यावर मर्यादा आहेत. शिवाय साक्षीदारांच्या साक्षीत विरोधाभास असला तरी हा मुद्दा या वेळी विचारात घेता येणार नाही, अशी निरीक्षणे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळताना नोंदवली.

सीबीआय सचिन वाझेंचा जबाब नोंदवण्याची शक्यता

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा जबाब महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अनिल देशमुख व इतर यांच्याविरोधात सीबीआयने गेल्या वर्षी गुन्हा दाखल केला होता. सरकारी पदावर असताना त्याचा गैरवापर केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आले आहे. सीबीआयचे नवी दिल्लीतील उपअधीक्षक आर.एस.गुंजीयाल यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीनुसार, सरकारी पदावर असताना त्याचा गैरवापर झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असून त्यानुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा :  Forest Guard Job: 1 हजारहून अधिक वनरक्षक पदांची होणार भरती, वनमंत्र्यांचा मोठा निर्णय



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …