4, 6, 6, 6 आणि Out…वादळी खेळीनंतर भानुका राजपक्षे बाद, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस 

KKR vs PBKS: मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर कोलकाता आणि पंजाब यांच्यातील आयपीएलमधील आठवा सामना सुरु आहे. कोलकाता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अय्यरचा हा निर्णय कोलकात्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला आहे. कारण पंजाबचा अर्धा संघ 100 धावांच्या आत माघारी परतला आहे.

पंजाबच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना वादळी सुरुवात केली. कर्णधार मयांक अग्रवाल बाद झाल्यानंतरही धावांची गती कायम ठेवली. तिसऱ्या क्रमांकावर फंलदाजीसाठी आलेल्या बानुका राजपक्षे याने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाज केली. राजपक्षेने कोलकात्याच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताल. राजपक्षेनं फक्त 9 चेंडूत 31 धावांची वादळी खेळी केली. यामध्ये तीन चौकार आणि तीन षटकारांचा पाऊस पाडला. 

राजपक्षेने चौथ्या षटकात शिवम मावीच्या गोलंदाजीची पिसे काढली. मावीच्या या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर राजपक्षेने चौकार लगावत आपले मनसुबे स्पष्ट केले होते. त्यानंतर राजपक्षे याने लागोपाठ तीन गगनचुंबी षटकार लगावले. राजपक्षेच्या वादळी खेळीनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे.  अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

पाहा व्हायरल मीम्स…

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …