2 लाखांची सोन्याची पोथ हरवल्यानंतर म्हशीवर संशय, पुढे जे झाले ते चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल

गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम: वाशिमच्या सारसी गावातील एका शेतकऱ्याच्या म्हशीने चक्क अडीच तोळे सोन्याची पोत गिळली. या पोतची किंमत साधारण दोन लाख रुपये इतकी आहे. काही कळण्याच्या आतच म्हशीने ही पोत फस्त केली. त्यानंतर ही पोत काढायची कशी असा प्रश्न उपस्थित झाला. ही घटना नेमकी कशी घडली? पोत कशी काढली? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. 

वाशिम जिल्ह्यातील सार्सी येथील शेतकरी रामहरी भोयर हे शेती व्यवसाय करतात. शेती म्हटलं की गुरे-ढोरे आलीच. त्यामुळे त्यांच्याकडे बैल, गाय, म्हैस अशी गुरेढोरे आहेत. खरीप हंगाम असल्याने ते सध्या शेतात सोयाबीन, तूर, उडीद ही पिके घेत आहेत. सोयाबीनला लागलेल्या शेंगा ते घरी घेऊन आले होते. त्यांच्या घरातील महिलांनी भाजी करण्यासाठी  सोयाबीन शेंगा सोलून त्याची टरफले ताटात काढली. दरम्यान रात्री झोपताना गळ्यातील दोन तोळे वजन असलेली सोन्याची पोथ अनावधानाने त्याच ताटात राहिली. 

मात्र शेंगाची टरफले सकाळी अलप गुराचे खाद्य म्हणून म्हशी समोर खाण्यासाठी  ठेवली. या शेंगाच्या टरफलासोबत सोन्याची पोथ देखील म्हशीच्या खाण्यात गेली. गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची पोथ न दिसल्याने  गिताबाई भोईर ह्या चक्रावून गेल्या. पोथ तुटून पडली की चोरीला गेली? हे त्यांना कळेनासे झाले. त्यामुळे त्यांनी आपले पती रामहरी भोयर यांना गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची पोत दिसत नसल्याचे सांगितले. पोत म्हशीच्या खाण्यात तर गेली नाही ना? अशी शंका त्यांना आली. 

हेही वाचा :  KDMC Job: कल्याण डोंबिवली पालिकेत नोकरी, थेट मुलाखतीतून होणार निवड

पत्नी गीताबाई भोयर दोन तोळ्यांची सोन्याची पोत कुठे पडली या चिंतेत होत्या. त्यानंतर आपण ताटात सोन्याची पोथ ठेवली होती,म्हशीने चाऱ्या सोबत खाली तर नाही ना? अशी शंका त्यांना येऊ लागली. यानंतर  त्यांनी आपल्या म्हशीला जनावराच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी मेटल डिटेक्शनवरून म्हशीच्या पोटात सोन्याची पोथ असल्याची खात्री केली. 

एक दिवस वाट बघितली आणि दुसऱ्या दिवशी भोयर यांनी म्हशीची सोनोग्राफी केली. त्यानंतर म्हशीची शस्त्रक्रिया करुन म्हशीच्या पोटातील दोन तोळ्याची सोन्याची पोथ काढण्यात आली. यानंतर भोयर परिवाराचा जिवात-जीव आला. या सोन्याच्या पोथीची किंमत अंदाजे अडीच लाख रुपये असल्याचे शेतकरी भोयर सांगतात. तर ऑपरेशननंतर सध्या म्हशीची तब्येत व्यवस्थित असून ती चारा खात आहे. जनावरांना चारा टाकताना काळजी घेण्याचं आव्हान डॉक्टरांनी केलं. चित्रपटाला लाजवेल अशा वास्तविक घटनेनंतर जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …