गेम खेळणाऱ्या 16 वर्षीय तरुणीवर ‘ऑनलाइन गँगरेप’; संपूर्ण देश हादरला, गृहमंत्रीही चिंतेत

Gang Raped In Virtual World: ब्रिटनमध्ये सायबर गुन्हेगारीमधील एक फारच विचित्र प्रकार घडला आहे. सध्या जगभरामध्ये या प्रकरणाची चर्चा आहे. येथे मेटाव्हर्समध्ये गेम खेळत असलेल्या एका 16 वर्षीय तरुणाच्या व्हर्चुअल अवतारावर ऑनलाइन गँगरेप करण्यात आला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या घटनेनंतर या मुलीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

अचानक तिला घेरलं अन्…

’16 वर्षीय मुलगी व्हर्चुअल रिअॅलिटी (व्हीआर) हेडसेट घालून ऑनलाइन गेम खेळत होती. त्याचवेळी व्हर्चुअल अवतारातील काही तरुणांनी तिच्या या व्हर्चुअल अवताराला घेरलं. व्हर्चुअल जगात ही सर्व मुलं या मुलीच्या व्हर्चुअल अवताराशी छेडछाड करु लागले आणि त्यांनी तिचा ‘गँगरेप’ केला,’ असं ‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

खऱ्या बलात्कार पीडितेसारखा त्रास

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला कोणतीही शारीरिक इजा झालेली नाही. तसेच कोणतेही शारीरिक नुकसान तिला झालेलं नाही. मात्र या मुलीच्या मानसिक परिस्थितीवर परिणाम झाला आहे. तिचं आता समोपदेशन केलं जात आहे. खऱ्या आयुष्यात बलात्कार पीडितेला जो मानसिक त्रास होतो तसाच त्रास या मुलीला झाला आहे, असं पोलिसांनी सांगितल्याचं ‘डेली मेल’च्या वृत्तात म्हटलंय. त्यामुळेच पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. 

हेही वाचा :  उद्धव ठाकरे खरे की रश्मी ठाकरे? खरं कोण, चौकशी करा! किरीट सोमय्या यांचा सवाल

अशा प्रकरणांकडे लक्ष द्यावं का

समोर आलेल्या माहितीनुसार, ही तरुणी ‘होरायझन वर्ल्ड्स’ नावाचा गेम खेळत होती. हा मेटाचा एक प्रोडक्ट आहे. मेटा ही फेसबुकची मातृक कंपनी आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या प्लॅटफॉर्मवर व्हर्चुअल लैंगिक शोषणाच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र युनायटेड किंग्डममध्ये या असल्या प्रकरणांमध्ये कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. आता हे असं प्रकरण समोर आल्यानंतर व्हर्चुअल जगातील या असा गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी वेळ घालवायला हवा का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खऱ्या जगात आधीपासूनच पोलिसांकडे बलात्काराची एवढी प्रकरणं असताना या गोष्टींना प्राधान्य द्यावं की व्हर्चुअल जागातील गुन्ह्यांना हे निश्चित करावं लागेल असं लोकांच म्हणणं आहे. 

गृहमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

ब्रिटनचे गृहमंत्री जेम्स क्लेवरली यांनी व्हर्चुअल गेममधील गँगरेपसंदर्भातील या घटनेचा तपास करण्याच्या निर्णयाचा समर्थन केलं आहे. या मुलीला झालेल्या मानसिक त्रासावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. या आभासी जगाला आपण हलक्यात घेऊन चालणार नाही, असा इशाराच या घटनेनं दिला आहे, असंही गृहमंत्री क्लेवरली म्हणाले. “इथे आपण एका लहान मुलीबद्दल बोलत आहोत. एका मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. याचा तिच्या मनावर मोठा परिणाम झाला आहे. आपल्याला या जगाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. याबद्दल आपण सावध रहाणं गरजेचं आहे,” असं क्लेवरली म्हणाले.

हेही वाचा :  मुलींचे पोट दुखल्याने रुग्णालयात नेलं; डॉक्टरांनी सांगितलेलं ऐकून वडिलांना धक्का



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …