भारतात दाखल झालं Pikachu Jet! दिल्लीत झालं आगमन; जाणून घ्या या विशेष विमानाबद्दल

Pikachu Jet Arrived In Delhi: भारतामधील जपानचे राजदूत हिरोशी सुजुकी यांनी पोकेमॉन थीमच्या बोइंग 787 विमानासंदर्भात केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेक भारतीयांचं लक्ष या पोस्टने वेधून घेतलं आहे. हिरोशी सुजुकी यांनी जपानच्या ऑल निप्पॉन एअरवेजच्या (एएनए) स्पेशल विमानाचा फोटो शेअर केला आहे. या कंपनीने नुकतेच आपल्या या खास विमानाचं उद्घाटन केलं. या विमानावर पोकेमॉन या प्रसिद्ध जपानी कार्टून सिरीजमधील पोकेमॉन रेखाटण्यात आले आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेला हा विमानाचा फोटो अनेकांच्या पसंतीत पडला आहे.

काय म्हटलं आहे जपानच्या राजदुतांनी?

“भारतामध्ये पिकाचूचं स्वागत आहे. एएनएच्या या पिकाचू जेटने पहिल्यांदाच दिल्लीसाठी उड्डाण केल्याचं पाहून फार आनंद झाला. हे विमान आता दिल्लीच्या आकाशात चकाकण्यासाठी तयार आहे,” अशी कॅप्शन हिरोशी सुजुकी यांनी या फोटोला दिली आहे. विमानाचं मुख्य आकर्षण हे त्याचं नाव आहे. या विमानाचं नाव पिकाचू असं ठेवण्यात आलं आहे. पोकेमॉन सिरीजमधील लोकप्रिय कॅरेक्टर असेला पिकाचू हा एखाद्या मोठ्या आकाराच्या उंदराप्रमाणे दिसणारा काल्पनिक प्राणी आहे. जगातील सर्वात लोकप्रिय कार्टून कॅरेक्टरमध्ये पिकाचूचा समावेश होता.

हेही वाचा :  अखिलेश यादव म्हणतात, “बड़ा कठिन है यूपी में सफ़र जो चल सको तो चलो! ” | Akhilesh Yadav said It is very difficult to travel in UP if you can walk msr 87

काय आहे या विमानावर?

पिकाचू जेटच्या बाहेरील बाजूस अनेक कार्टून कॅरेक्टर्सची चित्र काढण्यात आली आहे. यामध्ये हिरव्या, भगव्या, पिवळ्या, निळ्या रंगात वेगवेगळ्या पोकेमॉनची चित्र काढण्यात आली आहेत. विमानाच्या पंख्यावर पोकेबॉलचं चित्र काढण्यात आलेलं आहे. या विमानाच्या आतील भागातही पिकाचू थिम असल्याचं सांगितलं जात आहे.

अनेकांना आठवलं बालपण

या विमानाचा फोटो पाहून अनेकांना आपलं बालपण आठवलं आहे. ही पोस्ट पोकेमॉनच्या चाहत्यांना फारच आवडली आहे. या पोस्टला एका लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. शेकडोच्या संख्येनं या पोस्टला रिट्वीट आणि शेअर्स मिळाले आहेत. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करुन हे विमान फारच छान दिसत असल्याचं म्हटलं आहे. बऱ्याच जणांनी या विमानावरील कलाकारी लक्ष वेधून घेणारी आणि फारच आकर्षक असल्याचं म्हटलं आहे. 1990 च्या दशकामधील अनेकांनी हे विमान पाहून आपलं बालपण आठवल्याची भावना व्यक्त केली आहे. बऱ्याच जणांनी आपल्या बालपणीच्या सर्वात लोकप्रिय कॅरेक्टरला अशाप्रकारे थेट विमानावर स्थान दिल्याबद्दल या जपानी कंपनीचे आभार मानले आहेत.

…म्हणून विशेष उड्डाण

जपानची राजधानी असलेल्या टोकियोवरुन हे विमान दिल्लीमध्ये दाखल झालं आहे. या मार्गावरील विमानसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी या विशेष विमानाने उड्डाण घेतल्याचं सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा :  शिक्षकांना सर्वात मोठा दिलासा! राज ठाकरेंच्या प्रयत्नांना यश; अमित ठाकरेंनी शेअर केली 'ती' नोटीस



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

‘हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..’; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू व मुस्लिम …