EPFO : नोकरदारांसाठी मोठी बातमी! कोट्यावधी खातेधारकांच्या खात्यात पाठवले पैसे

EPFO Interest Credit Date: नोकरदारांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. EPFO ने आर्थिक वर्ष 2022 चे व्याजाचे पैसे (EPFO Interest) नोकरदारांच्या खात्यात पाठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान ही बातमी एकूण अनेक नोकरदारांनी त्याच्या खात्यातील रक्कम तपासायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या खात्यातील व्याजाची रक्कम तपासायची असेल तर खालील दिलेल्या 4 पर्यायाद्वारे तपासता येणार आहेत. 

किती व्याज मिळतंय?

केंद्र सरकारकडून पीएफवर (EPFO Interest)  8.1 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळत आहे. हा व्याजदर गेल्या 40 वर्षांतील सर्वात कमी आहे. त्याचवेळी, यापूर्वी 1977-78 मध्ये 8 टक्के दराने व्याज दिले जात होते.

सॉफ्टवेअर अपडेट होतेय

EPFO ने व्याजाची रक्कम (EPFO Interest) पाठवायला सुरूवात केली आहे. परंतु त्यानंतरही अनेक लोकांच्या स्टेटमेंटमध्ये व्याजाची रक्कम दिसत नाही.या प्रकरणावर सरकारने स्पष्टीकरण दिले आहे की, सॉफ्टवेअर अपडेट केले जात आहे, ज्यामुळे ते अनेक लोकांच्या स्टेटमेंटमध्ये दिसत नाही. मात्र लवकरच दिसेल अशी आशा देखील व्यक्त करण्यात येत आहे. 

हेही वाचा :  महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात पदवीधरांना नोकरीची संधी! थेट मुलाखतीतून होणार निवड

 ‘या’ पर्यायाद्वारे व्याजाची रक्कम तपासू शकता

मिस कॉल

तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून मिस कॉल देऊन व्याजाची रक्कम (EPFO Interest) देखील तपासू शकता. तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यानंतर तुमच्या नंबरवर व्याजाचे सर्व तपशील येतील.

अधिकृत वेबसाइट

तुम्ही अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in वर देखील तपासू शकता. या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला ई-पासबुकवर जावे लागेल. आता येथे तुम्हाला तुमचे युजरनेम (UAN नंबर), पासवर्ड आणि कॅप्चा भरावा लागेल. आता तुम्हाला सर्व तपशील मिळतील.

उमंग अ‍ॅप

उमंग अ‍ॅपद्वारे देखील तुम्ही पीएफच्या व्याजाची रक्कमही तपासू शकता. हे अ‍ॅप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. कर्मचारी-केंद्रित सेवेकडे जावे लागेल. ‘पाहा पासबुक’ वर क्लिक करा. यासह तुम्ही तुमचा UAN क्रमांक आणि पासवर्ड (OTP) क्रमांक भरा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. यानंतर तुम्ही तुमचा पीएफ शिल्लक तपासू शकता.

एसएमएस

तुम्ही या नंबरवर 7738299899 वर एसएमएस करून तुमची शिल्लक तपासू शकता. तुम्हाला EPFOHO लिहून संदेश पाठवावा लागेल. यानंतर तुम्हाला मेसेज मिळेल

दरम्यान हे चार पर्याय आहेत, या पर्यायाद्वारे तुम्हाला तुमच्या खात्यातील व्याजाची रक्कम तपासता येणार आहे. 

हेही वाचा :  Millionaires Running Away : तब्बल 8 हजार कोट्याधीशांनी सोडला देश,'हे' आहे धक्कादायक कारण



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घरभर 500 च्या नोटांचे ढीग! ED ला नोकराच्या घरात सापडले 25 कोटी? ‘या’ मंत्र्याशी कनेक्शन

Jharkhand ED Raid: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये आचारसंहिता लागू असतानाच झारखंडमध्ये सक्तवसुली संचलनालयाने मोठी कारवाई केली …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …