झोमॅटो फूड डिलिव्हरी बॉय ते सरकारी अधिकारी : विघ्नेशचा खडतर प्रवास….

सध्या झोमॅटोवरील एक ट्विट जबरदस्त गाजतंय “drop a like for Vignesh, who just cleared Tamil Nadu Public Service Commission Exam while working as a Zomato delivery partner” 

खरं आहे…विघ्नेशची कहाणी घरा-घरात पोहोचली आहे. त्याच्या या यशाबद्दल सोशल मीडिया यूजर्सकडून अभिनंदन होत आहे. विघ्नेश हा मूळ तामिळनाडूचा रहिवासी आहे. घराची परिस्थिती बेताची असल्याने काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. पण किती दिवस हे असं काम करत राहणार? हा प्रश्न सतावत होतं होता. दु:ख असलं तरी जिंदगीच्या शाळेत मार्ग मिळतोच म्हणून विघ्नेशने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दिवसभर काम करायचं आणि यातून अभ्यास करायचा हे नियोजन करत तो राज्यातील अवघड परीक्षा पास झाला. 

त्याआधी विघ्नेश एका खाजगी कंपनीत काम करत होता. त्याच दरम्यान त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला.  त्यांच्या उपचारासाठी पैशांची जमवाजमव करताना कंपनीकडे पैशांच्या मदतीची मागणी केली. परंतू त्याला कंपनीने नकार दिला. याच दरम्यान त्याच्या लक्षात आले की, सरकारी नोकरी असेल तर आपले सर्व स्वप्न पूर्ण होतील. काळानंतरने त्याने बॅकिंग सेक्टरमधलेही नोकरी केली. पण मन काही रमेना म्हणून नोकरी सोडल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.

हेही वाचा :  गुगलची नोकरी सोडून घेतला स्पर्धा परीक्षेचा धाडसी निर्णय; तीनदा अपयशी ठरून चौथ्या प्रयत्नात झाले IAS अधिकारी !

या परिस्थितीतून सर्व काही रुळावर आल्यानंतर विघ्नेशने सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला. लहानपणीपासून त्याच्या पालकांची इच्छा होती की त्याने सरकारी नोकरी करावी. त्यांचे स्वप्न पूर्ण करावे म्हणून त्याने कठोर अभ्यास केला आणि परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रचंड घेतली. पण नुसता अभ्यास करून घरचे भागत नसल्याने त्याने झोमॅटोमध्ये पार्ट टाईम नोकरी करत अभ्यास केला. आज तो ‘द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड’मध्ये प्रशासकीय अधिकारी या पदावर आहे. 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …