YouTube पाहताना ‘ही’ एक चूक करणं पडणार महाग; कंपनी तुम्हाला करु शकते ब्लॉक

YouTube AdBlocker: युट्यूब हे अनेकांसाठी मनोरंजनाचं ठिकाण आहे. वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट येथे मिळत असल्याने अनेकजण युट्यूबला प्राधान्य देतात. पण येथील जाहिराती अनेकदा मनोरंजनातील अडथळा ठरतात. या जाहिराती सुरुवातीला काही सेंकंदांच्या होत्या. तसंच त्या Skip करण्याचाही प्रयाय होता. पण आता मात्र स्थिती बदलली आहे. आता कोणताही व्हिडीओ पाहण्याआधी सर्व जाहिराती पाहाव्या लागतात. अनेकदा तर या जाहिरातींच्या संख्या 4 ते 5 पर्यंत असते. 

आता तर युट्यूबला कोणताही व्हिडीओ पाहताना आधी जाहिराती पाहाव्या लागतात. या व्हिडीओंना Skip करण्याचाही पर्याय नसतो. याच जाहिरातींना कंटाळून मग त्यातून पर्यायी मार्ग शोधला जातो. यासाठीच काहीजण Ad Blockers चा वापर करत आहेत. मात्र अशा युजर्सना रोखण्यासाठी युट्युबने मोठा निर्णय घेतला आहे.

काय आहे प्रकरण? 

Android Authority च्या एका रिपोर्टनुसार, युट्यब एका नव्या थ्री-स्ट्राइक पॉलिसीवर काम करत आहे. या योजनेंतर्गत कंपनी अशा युजर्ससाठी युट्बूब व्हिडीओ ब्लॉक करणार आहे, जे सलग तीन व्हिडीओ Ads Blocker चा वापर करत पाहतील. एका Reddit युजरने याचा स्क्रीनशॉटही पोस्ट केला आहे. ज्यामध्ये थ्री-स्ट्राइक पॉलिसी पॉप-अप होताना दिसत आहे. 

हेही वाचा :  उन्हाळ्यात AC कितीही सुरु ठेवलात तरी बिल वाढणार नाही, आजमावून पाहा या टिप्स

युजरने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये युट्यूबने दिलेला इशारा स्पष्ट दिसत आहे. या पॉप-अप बॉक्समध्ये तीन बॉक्स दिसत आहे, ज्यामध्ये क्रमांक दिले आहेत. Ads Blocker चा वापर केल्यानंतर युट्यूब संबंधित अकाऊंटची माहिती घेईल. यानंतर युट्यूब युजर्सला याची माहिती देईल आणि त्यांना वॉर्निंग देईल. 

जर एखाद्या युजरने Ads Blocker चा वापर करत सलग तीन व्हिडीओ पाहिले, तर युट्यूब त्यांना ब्लॉक करेल. पण कंपनीने युजर्स नेमकं कधीपर्यंत व्हिडीओ पाहू शकणार नाहीत हे स्पष्ट केलेलं नाही. दरम्यान, जर ब्लॉक केलं जाऊ नये अशी अपेक्षा असेल तर Ads Blocker काढून टाका असं आवाहन कंपनीने केलं आहे. 

प्रिमियम प्लानसाठी किती पैसे मोजावे लागणार?

जर व्हिडीओ पाहताना जाहिराती पाहण्याची इच्छा नसेल तर कंपनी YouTube Premium चं सबस्क्रीप्शन घेण्याचं आवाहन करत आहे. भारतात YouTube Premium Subsciption घ्यायचं असेल तर महिन्याला 129 रुपये भरावे लागतील. या प्लॅन अंतर्गत युजर्सना युट्यूबवर फक्त जाहिरातीमुक्त अनुभव मिळणार नाही तर तुम्ही YouTube Music ही वापरु शकता. त्यामुळे तुम्ही जर Ad Blocker वापरत असाल तर आताच सावध व्हा.

हेही वाचा :  महाराष्ट्राचा प्रतीक शेलार झाला लंडनमधील उद्योजक; सक्सेस स्टोरी पाहता येणार यूट्यूबवर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …