आयुर्वेदिक तज्ज्ञ दीक्षा भावसार यांच्या मते, दररोज असे केल्याने टाळूमधील ब्लड सर्क्युलेशन वाढते, ज्यामुळे निरोगी आणि नैसर्गिक काळ्या केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. पांढरे केस किंवा केसांच्या इतर समस्या दूर करण्यासाठी ही योगासने रोज काही मिनिटे केल्यास खूप फायदा होईल. जाणकार सुद्धा या गोष्टीची पुष्टी करतात की योग आसने केसांवर प्रभाव टाकू शकतात आणि त्यांना एक उत्तम आरोग्य देऊ शकतात. तुम्ही जर केसांच्या समस्येने त्रस्त असाल तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या केसांचे आरोग्य सुधारावे तर आवर्जून ही योगासने करून पाहा. चला तर जाणून घेऊया कोणती आहेत ही योगासने? (फोटो साभार: Indiatimes)
बालासन (चाइल्ड पोझ)

बालासन म्हणजे चाईल्ड पोझ होय. बालासन मोठ्या प्रमाणात तुमच्या केसांवर चांगला प्रभाव टाकते. हे आसन करण्यासाठी योगा मॅटवर सूर्याच्या दिशेने तोंड करून आपले पाय दुमडून बसा. यानंतर वज्रासन मुद्रेमध्ये बसा. आता श्वास घेऊन आपले दोन्ही हात वर घेऊन जा आणि मग श्वास हळूहळू सोडत पुढील बाजूस शरीर झुकवा. यावेळी तुमची बोटे जमिनीला टेकली पाहीजेत आणि डोकंही जमीनीला टेकलं पाहिजे. या पोझिशन मध्ये आल्यावर शरीराला काही मिनिटे असेच राहू द्या. आता हळूहळू श्वास घ्या आणि सोडा. या पोझिशन मध्ये 2 ते 3 मिनिटे राहा. रोज किमान 5 वेळा तरी ही क्रिया करा. (फोटो साभार: pexels)
(वाचा :- White Hair Remedies : पांढरे केस होतील चुटकीमध्ये काळेभोर व चमकदार, 1 रूपयाही न खर्च करता घरच्या घरी बनवा ‘हा’ नॅच्युरल उपाय..!)
शीर्षासन

हे आसन तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. शीर्षासन हे केसांसाठी खूप फायदेशीर आसन मानले जाते. केस निरोगी ठेवण्यासाठी अनेक सेलिब्रिटी देखील रोज हे योगासन करतात.हे आसन करण्यासाठी तुमच्या दोन्ही हातात मजबुती असणे गरजेचे आहे. सगळ्यात आधी वज्रासन स्थितीमध्ये बसा आणि आपला हात सरळ लाईन मध्ये मॅट वर असू द्या. आता डोके आपल्या दोन्ही हातांच्या मध्ये घ्या आणि हळूहळू पाय वर उचलायला सुरुवात करा. हातावर जोर देऊन पूर्ण शरीराचं संतुलन साधण्याचा प्रयत्न करा. तुमची पाठ या स्थितीत अगदी सरळ राहणे गरजेचे आहे. या पोझिशनमध्ये 20 ते 30 सेकंद तरी होल्ड करा. या दरम्यान दीर्घ श्वास घेत राहा आणि सोडत राहा. (फोटो साभार: अनुष्का शर्मा इंस्टाग्राम)
(वाचा :- Remedies For Hair Growth : 1 महिन्यात 4 ते 6 इंचाने लांबसडक व घनदाट होतील केस, 60ठी नंतरही गळणार नाहीत, करा ‘हे’ उपाय!)
शवासन

शवासन हे अत्यंत सोप्पे आसन असून तुम्हाला सुद्धा याचे फायदे नक्की माहीत असतील आणि त्यापैकी एक फायदा म्हणजे केसांना मिळणारे लाभ होय. शवासन मन आणि बॉडी दोन्हीला शांत करते. हे आसन तेव्हा केले जाते जेव्हा तुम्हाला आराम हवा असतो किंवा शरीर खूप जास्त थकलेले असेल. हे आसन केल्याने फक्त फ्रेशच वाटणार नाही तर यामुळे शरीराला उर्जा देखील मिळेल. या आसनासाठी योगा मॅटवर पाठीवर झोपा. दोन्ही हात शरीरापासून किमान 5 इंच तर दूर असू द्या आणि पायांच्या मध्ये किमान 1 फुटांचे अंतर असू द्या. आपले तळहात वरच्या बाजूस ठेवा आणि सैल सोडून द्या. शरीर सुद्धा सैल ठेवा आणि डोळे बंद करा. (फोटो साभार: pexels)
(वाचा :- Mira Rajput hair fall : केस गळतीने वैतागलेल्या मीरा राजपूतने कापले पौर्णिमेच्या दिवशी केस, सांगितले किती कामी आला ‘हा’ उपाय..!)
ओंकार प्राणायाम

रोज 10 ते 15 मिनिटे जरी तुम्ही ओंकार प्राणायाम केले तरी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. पण हे आसन सहसा शांत आणि एकांत असणाऱ्या जागीच करावे. तुम्ही हे प्राणायाम निसर्गाच्या सानिध्यातही करू शकता. पांढरे केस आणि केसांच्या इतर समस्या टाळण्यासाठी प्राणायामाचाही अनेक प्रकारे फायदा होतो. हा ओंकार प्राणायाम केल्याने तणाव, चिंता, निद्रानाश यांसारख्या समस्यांवर मात करण्यास मदत होते. यासाठी सुखासन मुद्रे मध्ये बसा आणि आपले डोके, मान, पाठ व कंबर सरळ ठेवा. नंतर डोळे बंद करून शांत ध्यान करा. आपल्या दोन्ही हातांच्या तर्जनीला अंगठ्याने जोडा. आता सामान्य वेगाने श्वास घ्या आणि ऊॅं मंत्रोच्चारासह श्वास बाहेर सोडा. ही प्रक्रिया दिवसातून किमान 10 वेळा तरी करा. तर अशी ही सर्व आसने तुम्हाला नक्कीच केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतील. (फोटो साभार: pexels)
(वाचा :- Betel Leaf for skin care : एका रात्रीत पिंपल्स बरे करू शकतं ‘हे’ एक पान, चेहरा ग्लोइंग बनवण्यासोबतच अनेक स्किन प्रॉब्लेम्सवर आहे रामबाण..!)
भ्रामरी प्राणायाम

सफेद केस आणि अन्य केसांच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर भ्रामरी प्राणायाम हे आसन तुम्हाला खूप जास्त लाभदायक ठरू शकते. शिवाय यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते. कारण अनिद्रा आणि तणाव हेच केस पांढरे होण्याचे मुख्य कारण असते. हे आसन करण्यासाठी एका जागी शांत बसून राहा आणि आपले डोळे बंद करा. आता आपल्या दोन्ही तर्जनी दोन्ही कानांवर ठेवा. यावेळी आपले तोंड बंद ठेवून नाकानेच श्वास घ्या आणि सोडा. शिवाय श्वास घेताना आणि सोडताना तोंडाने ऊँ हा उच्चार देखील करू शकता. ही क्रिया दिवसातून रोज 6 ते 7 वेळा तरी करा. हे आसन तुम्हाला खूप जास्त फायदा देईल हे मात्र नक्की! (फोटो साभार: शिल्पा शेट्टी इंस्टाग्राम)
(वाचा :- Amla Uses For Skin : 50 शीत दिसायचं आहे 20 शी सारखं तरूण? मग फक्त 10 रूपयांच्या ‘या’ गोष्टीचा असा करा वापरा..!)