‘या अफवांमुळे आमची मैत्री…’; ऋतुराज गायकवाडसोबतच्या अफेअरच्या चर्चेवर अखेर सायलीनं सोडलं मौन

Sayali Sanjeev,Ruturaj Gaikwad: मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि क्रिकेटपटू  ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु असते. ऋतुराज गायकवाडनं सायलीच्या एका फोटोवर कमेंट केली. त्या कमेंटनंतर सायली आणि ऋतुराज गायकवाड हे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर झाली. आता सायलीनं एका मुलाखतीमध्ये ऋतुराज आणि तिच्या अफेरच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली. 

काय म्हणाली सायली?

एका मुलाखतीमध्ये सायलीनं सांगितलं, ‘अफवांमुळे वैयक्तिक आयुष्यातही काही समस्या निर्माण होतात, गॉसिपमिंग करणाऱ्यांना हे समजत नाहीत. तो एक चांगला खेळाडू आहे. सुरुवातीला ‘छोड ना अफवा है’ म्हणत आम्ही ते टाळत होतो. जब सच्चाई बहार आ जायेगा तब सबको पता चल ही जायेगा, असे आम्हाला नेहमी वाटायचे. कदाचित आम्ही आमच्या संबंधित जोडीदाराशी लग्न केल्यावर लोकांना कळेल. पण दीड वर्ष झाले तरी या अफवा पसरत आहेत. आता आम्हाला,  बस करो यार असं म्हणावं वाटत आहे.’

‘आम्ही मित्रमैत्रीण होतो. या अफवांमुळे आमची मैत्रीही बिघडली आहे. आम्ही मित्र म्हणून एकमेकांशी बोलू शकत नाही. मला हे कळतच नाही की आमची नावं का एकमेकांशी जोडली जातात. या अफवांमुळे आता मला त्याच्या कामाचे कौतुक करता येत नाही. आता माझ्या कामाबद्दल तोही काही सांगू शकत नाही.’ असंही सायलीनं सांगितलं.

हेही वाचा :  ती व्यक्ती जबरदस्तीने...; कार्यक्रमात झालेल्या धक्काबुक्कीवर सोनू निगमने सोडलं मौन

News Reels

सायलीच्या ‘शुभमंगल ऑनलाईन’ आणि ‘काहे दिया परदेस’ या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. सायलीने ‘बस्ता’, ‘मन फकिरा’ आणि ‘सातारचा सलमान’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सायलीच्या ‘झिम्मा’ या चित्रपटातील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केले. सध्या सायली ही तिच्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Ruturaj Gaikwad: “मॅच बघितली का वहिनी? काय बॅटिंग केलीये…”; ऋतुराजच्या 7 षटकारांनंतर नेटकऱ्यांच्या सायलीच्या फोटोंवर कमेंट्स

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …