Wrestlers Protest: साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पूनिया नोकरीवर परतले, पण…

Wrestlers Vs Brijbhushan Singh: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (WFI) आणि भाजप नेते ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणारे भारतीय कुस्तीपटू आज आपल्या कामावर परतले. बजरंग पुनिया (Bajrang Punia), साक्षी मलिक (Sakshi Malik) आणि विनेश फोगाट (Vinesh Phogat) रेल्वेत नोकरी करतात, आज ते आपल्या कामावर रुजू झाले. पण कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतलेलं नाही. आंदोलन मागे घेत असल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं कुस्तीपटूंनी स्पष्ट केलं आहे. कुस्तीपटू साक्षी मलिकने यासंदर्भात ट्विट केलं आहे. आंदोलन सुरु ठेवत रेल्वेसाठी (Railway) आपलं कर्तव्य पार पाडणार असल्याचं साक्षी मलिकने सांगितलं. 

कुस्तीपटूंनी आपलं आंदोलन मागे घेतलं असं चुकीचं वृत्त पसरवण्यात आलं होतं. पण साक्षी मलिकने या वृत्ताचं खंडण केलं आहे. न्यायाच्या लढाईत आमच्यातलं कुणीही मागे हटणार नाही, निकाल लागेप्रयंत आमचं आंदोलन सुरुच राहिल, कृपया चुकीची बातमी चालवू नका. असं आवाहन साक्षी मलिकने केलं आहे. 

लैंगिक शोषणाचे आरोप
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर भारतीय कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.. 23 एप्रिलपासून कुस्तीपटू दिल्लीतल्या जंतर-मंतरवर आंदोलनाला बसले होते. त्याआधी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात जानेवारीतही कुस्तीपटूंनी धरणं आंदोलन केलं होतं. पण क्रीडा मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतलं होतं. 

हेही वाचा :  Rbi : आरबीआयची 13 बँकांवर कारवाई, खातेधारकांच्या पैशांचं काय?

ब्रिजभूषण यांच्याविरोधात तक्रार
21 एप्रिलला 7 कुस्तीपटूंनी दिल्लीतल्या कनॉट प्लेस पोलीस स्थानकात ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तर 28 एप्रिलला ब्रिजभूषण यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी लैंगिक शोषणाच्या दोन FIR दाखल केले. एक एफआयआर अल्पवयीन मुलीच्या तक्रारीच्या आधारे नोंदवण्यात आली असून POCSO अंतर्गत केस दाखल करण्यात आलीय. तर दुसरा एफआयआर हा इतर कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरुन नोंदवण्यात आला आहे. दोनही प्रकरणात पोलीस तपास करत आहेत. 

कुस्तीपटूंनी घेतली अमित शाहांची भेट
या प्रकरणात कुस्तीपटूंनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीत ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी कुस्तीपटूंनी केली. पण या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. 

साक्षी मलिकची कारकिर्द
कुस्तीपटून साक्षी मलिकने रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये ब्राँझ मेडल पटकावलं होतं. तर 2014 मध्ये ग्लासगो कॉमनवेल्थ स्पर्धेत 58 किलो वजनी गटात सिल्व्हर मेडल जिंकलं होतं. त्यानंतर 2015 मध्ये दोहात झालेल्या एशियन रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये 60 किलो वजनी गटात बाँझ मेडलची कमाई  केली होती. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …